एक चूक अन्...धावत्या बाईकवर तरुणाचे पुशअप्स; सोशल मीडियावर Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 04:04 PM2024-09-27T16:04:02+5:302024-09-27T16:05:01+5:30

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

a young man's pushups on a running bike; Video viral on social media... | एक चूक अन्...धावत्या बाईकवर तरुणाचे पुशअप्स; सोशल मीडियावर Video व्हायरल

एक चूक अन्...धावत्या बाईकवर तरुणाचे पुशअप्स; सोशल मीडियावर Video व्हायरल

Viral Video :सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. दररोज तुम्हालाही फेसबूक-इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. व्हायरल होण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. यात एक छोटी चूक झाली असती, तर मोठा अनर्थ झाला असता.

धावत्या बाईकवर पुशअप 
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण पुशअप्स करताना दिसत आहे. पण, इतरांप्रमाणे तो जिम, पार्क किंवा घरात पुशअप करत नाहीये, तर धावत्या बाईकवर पुशअप करताना दिसतोय. त्याच्या या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत.

व्हिडिओ पहा


हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर niraj_yadav_2512 नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला दोन लाख व्ह्यू मिळाले आहेत, तर 12 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण तरुणाचे कौतुक करत आहेत, तर काही त्याच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, अशाप्रकारचे धोकादायक स्टंट न करण्याचे लोकमत तुम्हाला आवाहन करत आहे. 

 

Web Title: a young man's pushups on a running bike; Video viral on social media...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.