प्री-वेडिंग शूटसाठी ओटीत चक्क शस्त्रक्रियेचा बनाव; रुग्णालयाचा गैरवापर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 09:14 AM2024-02-11T09:14:29+5:302024-02-11T09:15:04+5:30
ही घटना कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात घडली. संबंधित डाॅक्टरचे नाव डाॅ. अभिषेक असून ताे सरकारी रुग्णालयात कामाला आहे.
बंगळुरू : गेल्या काही वर्षांमध्ये प्री-वेडिंग फाेटाेशूटचे पेव फुटले आहे. लग्न करणारे जाेडपे त्यासाठी काय करतील, याचा नेम नाही. एका डाॅक्टरने चक्क सरकारी रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात शस्त्रक्रियेचा बनाव रचून फाेटाे काढले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे.
ही घटना कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात घडली. संबंधित डाॅक्टरचे नाव डाॅ. अभिषेक असून ताे सरकारी रुग्णालयात कामाला आहे. महिनाभरापूर्वीच रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहात त्याने प्री-वेडिंग फाेटाेशूट केले. साेशल मीडियावरील व्हिडीओमध्ये ताे रुग्णावर शस्त्रक्रिया करताना दिसताे. त्याची भावी पत्नी त्याच्या समाेर उभी असून त्याची मदत करताना दिसते. काही वेळाने रुग्ण उठताे आणि सर्व जण हास्य विनाेद करतात. सरकारी रुग्णालये खरे तर लाेकांच्या सेवेसाठी असतात. अशा वैयक्तिक वापरासाठी नाही, असे सांगून आराेग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी तत्काळ कारवाई केली.