Video: कॅमेरा बघून हत्ती संतापला, पर्यटकांच्या कारवर केला हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:44 PM2018-10-09T14:44:06+5:302018-10-09T14:46:15+5:30
जंगलात वेगवेगळे प्राणी पाहताना त्यांचे फोटो काढण्याचे काम यूरोप आणि जपानमधील काही पर्यटक करत होते. हे पर्यटक दक्षिण आफ्रिकेतील जंगलात फिरत होते.
जंगलात वेगवेगळे प्राणी पाहताना त्यांचे फोटो काढण्याचे काम यूरोप आणि जपानमधील काही पर्यटक करत होते. हे पर्यटक दक्षिण आफ्रिकेतील जंगलात फिरत होते. तेव्हाच यांची कार काही हत्तींपासून जात होती. काही पर्यटक हत्तीचे फोटो काढण्यात बिझी होते. पण अचानक असं काही घडतं की, सगळेच घाबरतात.
या पर्यटकांची कार जवळ येताच एका हत्तीने त्यांच्या कारवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ ५० सेकंदाचा असून साऊथ आफ्रिका लाईव्ह नावाच्या फेसबुक पेजवर शेअऱ करण्यात आला आहे. ६५ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ५०० पेक्षा जास्त लोकांनी तो शेअर केलाय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती फोटो घेत आहे. तेव्हाच अचानक एक हत्ती संतापलाय आणि तो पर्यटकांच्या गाडीकडे धावत येतो आहे. तो इतक्या वेगाने गाडीवर आलाय की, गाडीचं छप्पर आणि पॅसेंजर सीट तुटली आहे. सुदैवाने ड्रायव्हरच्या हुशारीमुळे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. काही वेळाने हत्तीचा रागही शांत झाला.