लय भारी! मराठमोळ्या दाम्पत्याने ६५ वर्षांनी पुन्हा लग्न केलं; पाहा झक्कास व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 02:59 PM2020-11-20T14:59:06+5:302020-11-20T15:02:40+5:30
८१ वर्षीय आजोबांनी ७२ वर्ष आजींशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहेत
माणसं शरीराने वयस्कर दिसत असली तरी वयाने मात्र तरूणच असतात. लग्न करून संसार थाटणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. लग्नाला आणि प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा जोडप्यानं दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रातील दाम्पत्याचा हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. ८१ वर्षीय आजोबांनी ७२ वर्ष आजींशी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेले सीताराम हिरवाले आणि निर्मला इंगोले या वृद्ध दाम्पत्याने पुन्हा एकदा लग्न केले आहे.
८१ वर्षाचा नवरा अन् ७२ वर्षाची नवरी...६५ वर्षानंतर पुन्हा आजी-आजोबा चढले बोहल्यावर.... #SocialViral#marriagepic.twitter.com/49JQJJo5Av
— Lokmat (@MiLOKMAT) November 20, 2020
आई वडिलांच्या लग्नाच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी या वृद्ध दाम्पत्याच्या मुलांनी पुन्हा एकदा लग्न लावून दिलं आहे. सीताराम आणि निर्मला यांचा विवाह १९५५ मध्ये खंडाळा येथे संपन्न झाला होता. त्यावेळी निर्मला या ६ वर्षाच्या होत्या तर सीताराम हे १५ वर्षांचे होते. या वृद्ध दाम्पत्याचा मोठा मुलगा हा शेतकरी आहे. यांनी सांगितले की, ''आई बाबांच्या लग्नाला ६५ वर्ष पूर्ण झाली पण त्यांच्याकडे लग्नाच्या आठवणी मात्र नाहीत. म्हणून आम्ही पुन्हा एकदा प्रथा परंपरांनुसार लग्न लावून देण्याचा विचार केला. ''
५० फूट खोल विहिरीत पडलं हत्तीचं पिल्लू; अन् शेतकऱ्याला आवाज येताच सुरू झालं रेस्क्यू; पाहा फोटो
या दाम्पत्याने लग्न करताना पुन्हा एकदा हळदीचा कार्यक्रम केला आणि सप्तपदी सुद्धा घेतली. या दाम्पत्याचा लहान मुलगा ग्राम सेवक आहे. त्यांनी सांगितले की, ''ही कल्पना माझ्या डॉक्टर असलेल्या मुलीची होती. त्यानंतर लग्नाच्या पत्रिका छापून ५० लोकांना आमंत्रण देण्यात आलं. या सोहोळ्यात संपूर्ण कुटूंब सहभागी होते. जेव्हा नातवड्यांनी आजीआजोबांना आग्रह केला तेव्हा ते या लग्नासाठी तयार झाले.'' आता सर्वत्र या आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा होत आहे. VIDEO: २२ वर्षांचा तरुण करतोय चौथ्या लग्नाची तयारी; तीन बायकांसह घेतोय चौथीचा शोध