मास्क काढल्याने महिलेनं विमानातच वृद्ध माणसाच्या कानशिलात लगावले, घटना कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 06:22 PM2021-12-28T18:22:40+5:302021-12-28T18:25:50+5:30
विमानात बसल्यावर मास्क काढलेल्या व्यक्तीचा महिलेला इतका राग आला की तिने त्याच्याशी थेट भांडणच उकरून काढलं. ते भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या महिलेनं त्या वृद्ध माणसाच्या कानशिलात लगावली
विमानात (Flight) एका प्रवाशाने (Traveller) स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क (Face Mask) काढल्यामुळे रागावलेल्या महिलेनं (Angry Woman) त्याच्या कानशिलात (Slapped on face) भडकावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. कोरोनाचा प्रभाव (Corona impact) कमी झाल्याचं गेल्या काही महिन्यांत वाटत असलं तरी ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा जगभर भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीती आणि चिंता या भावना घर करत असून स्वतःचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी ते सर्वतोपरी मदत करत आहेत. त्यामुळेच विमानात बसल्यावर मास्क काढलेल्या व्यक्तीचा महिलेला इतका राग आला की तिने त्याच्याशी थेट भांडणच उकरून काढलं.
फ्लोरिडाहून टेंपासाठी जात असलेल्या विमानात एका महिलेनं अक्षरशः गोंधळ घातला. या विमानात महिलेच्या शेजारी एक ज्येष्ठ नागरिक बसले होते. त्यांनी विमानात येताना मास्क लावला होता. मात्र विमानात बसल्यानंतर त्यांनी चेहऱ्यावरून तो मास्क खाली घेतला. या प्रकारामुळे संतापलेली महिला जागेवरून उठली आणि नागरिकाशी वाद घालायला सुरुवात केली. बघता बघता हे भांडण विकोपाला गेलं आणि इतरांना मध्यस्थी करण्याची गरज निर्माण झाली.
व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे सुुरुवातीला सुरु झालेल्या वादाचं रुपांतर हळूहळू शिवीगाळ आणि आरडाओरडा यात झालं. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्याचा राग अनावर होऊन महिलेनं त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मात्र विमानातील कॅबिन क्रूनं पोलिसांना पाचारण केलं. पॅट्रिशिया कॉर्नवॉल असं या महिलेचं नाव आहे.