Video - DSP लेकाच्या सरकारी गाडीच्या आई पाया पडली मग बसली, म्हणाली...; हृदयस्पर्शी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:23 PM2024-03-12T15:23:03+5:302024-03-12T15:26:01+5:30
मुलगा आईला घेऊन ग्वाल्हेरच्या जत्रेला गेला आणि तोही त्याच्या सरकारी गाडीतून. विशेष बाब म्हणजे वृद्ध आईने सरकारी गाडीत बसण्याआधी गाडीला नमस्कार केला.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे तैनात असलेले डीएसपी संतोष पटेल यांचे अनेक चांगले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते आपल्या आईला सरकारी गाडीत बसवून फिरवताना पाहायला मिळत आहेत.
जिल्ह्य़ातील बेहट येथे तैनात असलेल्या एसडीओपी संतोष पटेल यांची आई गोल्हूबाई आपल्या मुलाकडे पन्ना जिल्ह्यातील गावातून ग्वाल्हेरला आल्या आहेत. यावेळी पोलीस अधिकारी मुलगा आईला घेऊन ग्वाल्हेरच्या जत्रेला गेला आणि तोही त्याच्या सरकारी गाडीतून. विशेष बाब म्हणजे वृद्ध आईने सरकारी गाडीत बसण्याआधी गाडीला नमस्कार केला.
माँ सरकारी गाड़ी में पैर छूकर बैठी।पूँछा तो बोलीं कि जब हम घर छोड़कर गाड़ी में बैठते हैं तो वाहन जीवन व भगवान होता है जिसके भरोसे ज़िंदगी सकुशल मंज़िल तक पहुँचती है।माँ की नक़ल कर वाहन को प्रणाम कर बैठा करता हूँ।इज्जत दोगे-इज्जत मिलेगी।दुनिया मेंgive and take का फार्मूला चलता है। pic.twitter.com/Of2ZHkXaIc
— Santosh Patel DSP (@Santoshpateldsp) March 12, 2024
डीएसपी मुलाने लिहिलं की, "आई सरकारी गाडीच्या पाया पडली आणि गाडीत बसली. असं का केलंस असं विचारलं असता ती म्हणाली की, आपण घरातून निघून गाडीत बसलो की वाहन म्हणजे जीवन आणि देव, कारण त्यावर अवलंबून राहून आपण आपल्या गंतव्यस्थानी सुखरूप पोहोचतो. त्यानंतर मीही तिच्याप्रमाणेच गाडीला नमस्कार केला.आदर दिलात तर आदर मिळेल. जगात द्या आणि घ्या हा फॉर्म्यूला चालतो."
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले डीएसपी संतोष पटेल कधी एखाद्या वृद्ध व्यक्तीला किंवा मुलाची मदत करताना दिसतात, तर कधी आपल्या आईशी हृदयस्पर्शी संवाद साधताना दिसतात. सुमारे वर्षभरापूर्वी डीएसपी संतोष पटेल हे आई गोल्हूबाई यांना भेटण्यासाठी आले होते. शेतात गवत कापत असलेल्या आईला आपल्या मुलाला पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात पाहून खूप आनंद झाला.
डीएसपी मुलाने आईला विचारलं होतं, तू आता गवत का कापते आहेस? तर उत्तर मिळालं की गवत कापलं नाही तर म्हशी काय खातील? मुलगा पुढे म्हणाला, पैसे देऊन विकत घे. तेव्हा आईकडून उत्तर आलं की चार लोक येत आहेत आणि चहासाठी दूध लागेल. असंच बसण्यापेक्षा काम करणं चांगलं. आई आणि मुलाचा स्थानिक बोलीभाषेतील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.