दही, शेव अन् चटण्यांनी भरलेलं चमचमीत टोकरी चाट खा! अन् बक्षीस मिळवा, पाहा आहे का खरं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 08:06 PM2022-01-26T20:06:11+5:302022-01-26T20:10:02+5:30

सामान्यपणे काही खायचं म्हटलं की आपल्याला आपला खिसा रिकामा करावा लागतो. म्हणजे आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण जर तुम्हाला खाण्यासाठी कुणी पैसे देत असेल तर...

Agra chat corner offers challenge to eat tokari chat, person will get prize to finish the chat | दही, शेव अन् चटण्यांनी भरलेलं चमचमीत टोकरी चाट खा! अन् बक्षीस मिळवा, पाहा आहे का खरं?

दही, शेव अन् चटण्यांनी भरलेलं चमचमीत टोकरी चाट खा! अन् बक्षीस मिळवा, पाहा आहे का खरं?

googlenewsNext

सामान्यपणे काही खायचं म्हटलं की आपल्याला आपला खिसा रिकामा करावा लागतो. म्हणजे आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण जर तुम्हाला खाण्यासाठी कुणी पैसे देत असेल तर... (Food eating challenge) यापेक्षा उत्तम संधी दुसरी कोणतीच नाही ना. खरंतर खवय्यांसाठीही तर ही सुवर्णसंधीच आहे. एका ठिकाणी तुम्हाला चाट खाण्यासाठी पैसे दिले जाणार आहे (Earn money by eating chaat). पण त्यासाठी एक अटही ठेवण्यात आली आहे (Chaat offer).

काही लोकांना स्ट्रीट फूड खूप आवडतं. अशाच एका स्ट्रीट फूडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहताच तुमच्या तोंडात पाणी येईल. या व्हिडीओत चाट दाखवण्यात आला आहे. चाट बनवण्याची पूर्ण प्रक्रियाही यात आहे. चाट तयार होताच तो आपल्याला कधी खायला मिळेल असंच आपल्याला वाटतं. त्यातही इतका टेस्टी चाट खाण्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत पैसे मिळणार आहेत, असं सांगितलं तर मग काय? चाट खाण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखूच शकणार नाही.

या व्हिडीओत तुम्ही ऐकू शकता चाट विक्रेत्याने हा टेस्टी चाट खाणाऱ्या आपल्या ग्राहकांना पैसे ऑफर केले आहेत. जो हा चाट खाईल, त्याला ५०० रुपये मी देणार असं तो सांगतो.पण यासाठी एक चॅलेंजही त्याने दिलं आहे. हा कटोरी चाट एकाच बाइटमध्ये खायचा आहे. काय मग तुम्ही हे चॅलेंज स्वीकारायला तयार आहात का?

आता सर्वात महत्त्वाता प्रश्न हा चाट तुम्हाला नेमका कुठे खायला मिळेल. तर हे दुकान आग्र्यात आहे.  ARE YOU HUNGRY नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

 

Web Title: Agra chat corner offers challenge to eat tokari chat, person will get prize to finish the chat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.