बॉयफ्रेंड नाही, तर व्हॅलेंटाईन डेपासून प्रवेश नाही; या कॉलेजचं लेटर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 03:53 PM2021-01-28T15:53:46+5:302021-01-28T15:54:56+5:30
येत्या व्हॅलेंटाइन डे निमित्ताने सोशल मीडियावर आग्र्यातील सेंट जोंस कॉलेजचं एक कथित लेटर खूप व्हायरल झालं आहे. हे लेटर वाचून अनेकजण हैराण झाले आहे.
दरवर्षी १४ फेब्रुवारीला तरूणाईकडून व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. या दिवसाला प्रेमदिवस म्हणून ओळखलं जात. या दिवशी लोक आपलं प्रेम व्यक्त करतात, आपल्या प्रियसोबत फिरतात आणि त्यांना भेटवस्तू देतात. केवळ भारतातच नाही तर जगभरात हा दिवस खूप जल्लोषात साजरा केला जातो.
व्हायरल झालं कॉलेजचं अजब लेटर
यानिमित्ताने सोशल मीडियावर आग्र्यातील सेंट जोंस कॉलेजचं एक कथित लेटर खूप व्हायरल झालं आहे. हे लेटर वाचून अनेकजण हैराण झाले आहे. काहींना हसू आलं तर काहींना यावर रागही येतोय. पण असं काय आहे या लेटरमध्ये की लोक यावर इतकी चर्चा करत आहेत.
बॉयफ्रेन्ड कम्प्लसरी
सेंट जोंस कॉलेजच्या लेटरहेडवर लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे व्हॅलेंटाइन डे पर्यंत कमीत कमी एक बॉयफ्रेन्ड नक्की बनवा. तुम्हाला सरक्षेच्या कारणाने तसं करावं लागेल. कॉलेजमध्ये एकट्या तरुणीला प्रवेश बंद असेल किंवा बॉयफ्रेन्डसोबतचा फोटो दाखवल्यावरच कॉलेजमध्ये एन्ट्री मिळेल. फक्त प्रेम वाटा'.
कुणी दिले आदेश
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या लेटरमध्ये सेंट जोंस कॉलेजचे असोसिएट डीन प्रा. आशीष शर्मा यांच्या नावाने हे निर्देश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार कॉलेजच्या द्वितीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनींना १४ फेब्रुवारीपर्यंत बॉयफ्रेन्ड बनवणं अनिवार्य आहे.
व्हायरल लेटरवर कॉलेजचं स्पष्टीकरण
सेंट जोंस कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. एस पी सिंह यांनी एक नोटीस जारी केली आहे. त्या ते म्हणाले की, कॉलेजमध्ये प्रा. आशीष शर्मा नावाचे कुणीही प्राध्यापक नाहीत. हे लेटर फेक आहे. ज्यानेही हे केलं असेल त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. हा प्रकार फारच लाजिरवाणा आणि चुकीचा आहे.