६ वर्षाच्या मुलासोबत आईनं बनवलं भन्नाट ‘एग्रीमेंट’; तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलं नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 07:39 PM2022-02-03T19:39:32+5:302022-02-03T19:44:17+5:30

तुम्हाला आठवत असेल तुम्हीही परीक्षेच्या काळात वेळेचं नियोजन केले होते. परंतु आपल्याला हे चांगलंच ठाऊक आहे ते काही ठराविक दिवसांपुरतं असतं

'Agreement' made by mother with 6 year old child about his time table ; You have never seen it before | ६ वर्षाच्या मुलासोबत आईनं बनवलं भन्नाट ‘एग्रीमेंट’; तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलं नसेल

६ वर्षाच्या मुलासोबत आईनं बनवलं भन्नाट ‘एग्रीमेंट’; तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलं नसेल

googlenewsNext

मुलं लहान असतील तर आई वडिलांना नेहमी चिंता लागते. लहान मुलं कधी टाइम टेबल बनवत नाहीत आणि बनवलं तर योग्यरित्या ते फॉलो करत नाहीत. रोज कधी उठायचं, कधी ब्रेकफास्ट करायचा, कधी आंघोळ करायची. अभ्यास, झोप याचं काहीही टाइम फिक्स नसतं. त्यामुळेच पालक नेहमी मुलांच्या या सवयीमुळे त्रस्त असतात. अखेर मुलगा कधी वेळच्या वेळी सगळं काही करेल हा विचार पालकांना असतो.

अजब-गजब टाइम टेबल पाहून लोकं हैराण

तुम्हाला आठवत असेल तुम्हीही परीक्षेच्या काळात वेळेचं नियोजन केले होते. परंतु आपल्याला हे चांगलंच ठाऊक आहे ते काही ठराविक दिवसांपुरतं असतं. त्यानंतर आपल्या वेळेचं नियोजन बिघडतं. सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यात एका पालकाने त्याच्या ६ वर्षीय मुलाचं टाइम  टेबल तयार केले आहे. इतकचं नाही तर त्यांनी मुलासोबत करारही केला आहे.

६ वर्षाच्या मुलासोबत आईचा दिनक्रम

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका यूजर्सनं हे टाइम टेबल शेअर केले आहे. ज्यात काही गोष्टी अशा लिहिल्या आहेत ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. फोटोसह याला कॅप्शन दिलंय की, मी आणि माझ्या ६ वर्षाच्या मुलानं आज एक करार साइन केला आहे. जो त्याच्या डेली शेड्यूल आणि परफॉर्मेंसवर लिंक्स बोनस आधारित आहे. म्हणजे आईनं मुलाच्या सहमतीनं हे वेळेचं नियोजन तयार केले आहे. ज्यात खेळणे, खाणे-पिणे, दूध पिणे या सगळ्यांचा समावेश आहे.

रुटीन फॉलो करण्यासाठी करारात ठेवली विशेष अट

टाइम टेबलवर पाहू शकता की, अलार्म सकाळी ७.५० चा ठेवला आहे. तर उठण्याची वेळ ८.०० आहे. त्यानंतर ब्रश, ब्रेकफास्ट, टीव्ही पाहणे, फळ खाणे, खेळणे, होमवर्क करणे, टेनिस खेळणे, डिनर, स्वच्छता करणे, झोपणे या सर्व गोष्टीची वेळ ठरवण्यात आली आहे. इतकंच नाही तर जर दिवसभरात न रडता, न ओरडता, काहीही गोंधळ न घालता दिवस पूर्ण झाला तर १० रुपये मुलाला मिळणार आहेत. त्याचसोबत जर रुटीन फॉलो करत विना रडत, विना ओरडत सलग ७ दिवस घालवले तर १०० रुपये मिळणार. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या एग्रीमेंटमुळे अनेक जणांना भन्नाट कल्पना वाटत आहे. लोकं जास्तीत जास्त शेअर करत आहेत.

Web Title: 'Agreement' made by mother with 6 year old child about his time table ; You have never seen it before

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.