शाब्बास पोरी! ६० म्हशींचा सांभाळ अन् २ मजल्यांचा गोठा, पारनेरच्या मराठमोळ्या श्रद्धाचा प्रवास
By Manali.bagul | Published: November 26, 2020 06:25 PM2020-11-26T18:25:00+5:302020-11-26T19:17:22+5:30
Inspirational success stories in Marathi : श्रद्धा ढवण नावाची ही तरूणी आपलं शिक्षण पूर्ण करत असताना १, २ नाही तर ६० म्हशींचा सांभाळ करत आहे.
आजही समाजातील अनेक स्त्री शिक्षणापासून आणि नोकरीपासून वंचित आहेत. अनेक घरात कुटुंबप्रमुख म्हणून नेहमी मुलांना पुढे आणलं जातं. आज आम्ही तुम्हाला स्त्री शक्तीची जाणीव करून देईल अशी घटना सांगणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील तरूणीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत तब्बल ६० म्हशींचा सांभाळ करून कुटुंबाला हातभार लावला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. श्रद्धा ढवण नावाची ही तरूणी आपलं शिक्षण पूर्ण करत असताना १, २ नाही तर ६० म्हशींचा सांभाळ करत आहे.
श्रद्धा ढवण नावाची ही तरूणी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे राहते. श्रद्धा मुलीकादेवी महाविद्यालयात श्रद्धा TYBSc मध्ये शिक्षण घेत आहे. तिचे वडील दिव्यांग असून लहान बहिण पुण्यात शिक्षण घेत आहे तर भाऊ दहावीला आहे.
अभिमानास्पद! बीएमसीच्या शाळेतली अन् चाळीतल्या घरात वाढलेली सुवर्णा; आता ‘नासा’ची कर्मचारी
अशा स्थितीत कुटूंबाचा संपूर्ण भार श्रद्धाच्या आणि तिच्या आईच्या खांद्यावर आला. आईचं ओझं हलकं व्हावं म्हणून ब्बल ६० म्हशींचा सांभाळ करत श्रद्धा आत्मनिर्भर बनली आहे. घराजवळच तिने या म्हशींसाठी २ मजली गोठा देखील बांधला. म्हशींसाठी २ मजली गोठा बांधणं असं जिल्ह्यात प्रथमचं झालं आहे.
त्रिवार सलाम! महामारीमुळे कोरोना योद्धांची होतेय दयनीय अवस्था; ८ महिन्यांनी बदलला नर्सचा चेहरा
श्रद्धा रोज सकाळी उठून स्वतःचे आवरून म्हशी धुणे, दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध डेअरीवर नेऊन घालणे हे कामं करते. यासह म्हशींसाठी पेंड किंवा म्हशीचे खाद्य घेऊन येणे आणि म्हशीला खाऊ घालणे ही सर्व कामं श्रद्धाला करावी लागतात. या सगळ्या कामाच्या व्यापातून वेळ काढून श्रद्धा संध्याकाळी अभ्यासाला बसते. श्रद्धाच्या या कामाबद्दल तिच्या आई वडिलांनाच नाही तर संपूर्ण गावाला तिचा अभिमान वाटतो. गावातील लोक श्रद्धाचे कौतुक करतात. कमी वयात एखाद्या मुलाप्रमाणे श्रद्धाने ही जबाबदारी अंगावर घेतल्यामुळे समाजासमोर एक वेगळा आदर्श तिने ठेवला आहे.