डोनाल्ड ट्रम्प-कमला हॅरिस यांचा AI ने तयार केलेला रोमँटिक बनावट Video झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 01:35 PM2024-08-19T13:35:13+5:302024-08-19T13:35:43+5:30
Donald Trump Kamala Harris AI Viral Video: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांचा एक बनावट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Donald Trump Kamala Harris AI Viral Video: सोशल मीडियाच्या युगात दररोज विविध घटना घडत असतात. घटना चांगली असो वा वाईट, त्या घटनेबाबत संपूर्ण जगात चर्चा सुरु होते. अनेकदा खोट्या गोष्टीही झटपट व्हायरल होतात. आता तर सोशल मीडियाला AI ची म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्सची साथ मिळाल्याने काय खरे, काय खोटे हे ठरवणे सामान्य युजरसाठी अवघड होऊन बसले आहे. AIचा वापर विविध नेतेमंडळी आपल्या प्रचारातही करतात. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्याबाबत एक विचित्र व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या बाबतीत चर्चा रंगल्या आहेत.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा AI ने तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडिया साइटवर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ XAI या ट्विटरचे मालक असलेल्या एलॉन मस्क यांच्या AI फर्मने बनवला आहे, ज्यांचे टूल Grok-2 आता वादात आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
This AI generated viral video online is pretty hilarious 🤣 pic.twitter.com/gc9Md9UdLD
— Dominic Lee 李梓敬 (@dominictsz) August 18, 2024
डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस हे २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. परंतु एआय व्हिडिओमध्ये या दोघांचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. हे दोघे प्रियकर-प्रेयसी असल्याचे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे. एआय व्हिडिओमध्ये कमला हॅरिस आणि ट्रम्प रोमान्स करताना दिसत आहेत. एका फ्रेममध्ये ते एकमेकांना किस करत आहेत, दुसऱ्या फ्रेममध्ये ते एकांतात सुंदर क्षण घालवत आहेत. व्हिडिओमध्ये ट्रम्प आणि कमला यांना मुलगाही दाखवण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.