ऋषी सुनक यांचे हेडफोन पाहून अमन गुप्ता खूश; इन्स्टावरून केलं 'ब्रँडेड' स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 07:10 PM2023-09-09T19:10:13+5:302023-09-09T19:12:06+5:30

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक boAt हेडफोनसह दिसल्यानंतर, कंपनीचे सीईओ अमन गुप्ता यांनी त्यांची प्रतिक्रिया मनोरंजक पद्धतीने दिली आहे.

Aman Gupta spots UK PM Rishi Sunak wearing boAt headphones | ऋषी सुनक यांचे हेडफोन पाहून अमन गुप्ता खूश; इन्स्टावरून केलं 'ब्रँडेड' स्वागत

ऋषी सुनक यांचे हेडफोन पाहून अमन गुप्ता खूश; इन्स्टावरून केलं 'ब्रँडेड' स्वागत

googlenewsNext

दिल्ली येथे G20 शिखर परिषद होत आहे. या परिषदेसाठी जगभरातील मोठे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेही दाखल झाले आहेत, काल दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी भेटी दिल्या. या दरम्यानचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. काल त्यांनी एका फोटोत बोट कंपनीचे हंडपोन लावल्याचे दिसत आहे. यावरुन बोट कंपनीचे सीईओ अमन गुप्ता यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टचा स्क्रीन शॉट शेअर करत स्वागत केले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक G20 शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर असताना कानात boAt हेडफोन घातलेले दिसले. याचे फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. ऋषी सुनक boAt हेडफोनसह दिसल्यानंतर, कंपनीचे सीईओ अमन गुप्ता यांनी त्यांची प्रतिक्रिया मनोरंजक पद्धतीने दिली आहे. आपल्या इंस्टाग्रामवर सुनक यांच्या पोस्टचा स्क्रीन शॉट शेअर करताना अमन गुप्ता यांनी लिहिले, "भारत में आप का boAt boAt स्वागत" आता या पोस्टवर यूजर्स खूप अनोख्या कमेंट करत आहेत. अमन यांच्या फॉलोअर्सपैकी एकाने त्यांना या पोस्टसाठी मार्केटिंग प्रतिभावंत म्हटले.

जी-२० साठी आलेल्या पाहुण्यांपासून आपले सरकार भारतातील गरिबांना लपवत आहे - राहुल गांधी 

भारताची राजधानी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातील शक्तिशाली नेते दिल्लीत उपस्थित आहेत. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्यासोबत IMF आणि WHO सारख्या जगातील सर्व मोठ्या संस्थांचे नेतेही दिल्लीत पोहोचले आहेत.

Web Title: Aman Gupta spots UK PM Rishi Sunak wearing boAt headphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.