एक असं डिजिटल आर्ट ज्यात दडलं आहे अनोखं विश्व, एकदा बघाल बघतंच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:55 AM2023-10-26T10:55:13+5:302023-10-26T10:57:15+5:30

Viral Video : नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात डिजिटल फोटोचं अनोखं रूप बघायला मिळालं. या फोटोत एक वेगळंच विश्व लपलं आहे. हा फोटो बघून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.

Amazing Digital art video show another world with story twitter viral video | एक असं डिजिटल आर्ट ज्यात दडलं आहे अनोखं विश्व, एकदा बघाल बघतंच रहाल!

एक असं डिजिटल आर्ट ज्यात दडलं आहे अनोखं विश्व, एकदा बघाल बघतंच रहाल!

Viral Video : एक काळ होता जेव्हा लोक पेन्सिल आणि रंगांच्या माध्यमातून पेपरवर ड्रॉईंग काढत होते. पण जेव्हापासून कॉम्प्युटर आला, टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा झाली तेव्हापासून लोक डिजिटल पद्धतीने ड्रॉईंग केली आहे. आजकाल डिजिटल आर्ट फार चर्चेत आहे. हे आर्ट फार अनोख्या पद्धतीचे असतात. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात डिजिटल फोटोचं अनोखं रूप बघायला मिळालं. या फोटोत एक वेगळंच विश्व लपलं आहे. हा फोटो बघून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.

@TheFigen_ या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात तुम्ही हे कमाल डिजिटल आर्ट बघू शकता. हा फोटो जसजसा झूम केला जातो त्यात तुम्हाला एक वेगळंच विश्व बघायला मिळतं. फोटो फारच सुंदर आहे. ज्यात वेगवेगळ्या स्टोरी आहेत. 

झूम केल्यावर या फोटोत एक वेगळं चित्र दिसतं. मग त्या चित्रात आणखी एक चित्र लपलेलं दिसतं. प्रत्येक चित्राला एक वेगळा अर्थ आहे. जे दिसायला फारच सुंदर दिसतं. 

या व्हिडिओला आतापर्यंत 36 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांना यावर कमेंट्स केल्या आहेत. 

Web Title: Amazing Digital art video show another world with story twitter viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.