Video : लसूण सोलण्यास लागणार नाही जास्त वेळ, 'या' जबरदस्त ट्रिकने लगेच होईल काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:44 PM2024-09-05T14:44:26+5:302024-09-05T14:45:52+5:30
Viral Video : एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून ज्यात तुम्हाला काही सेकंदात लसूण सोलण्याची ट्रिक सांगण्यात आली आहे.
Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही असेही व्हिडीओ असतात जे बरेच कामाचे असतात. म्हणजे या व्हिडिओंमध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या टिप्स दिलेल्या असतात ज्या आपलं काम सोपं करतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून ज्यात तुम्हाला काही सेकंदात लसूण सोलण्याची ट्रिक सांगण्यात आली आहे.
स्वयंपाक करण्याआधी लसूण सोलण्यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा भरपूर वेळ जातो. एक एक कळी सोलण्याला खूप वेळ लागतो. अशात बाकीची कामेही उशीरा होतात. मात्र, या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली ट्रिक तुम्ही वापराल तर तुमचा लसूण सोलण्याचा बराच वेळ वाचू शकतो. ही इतकी सोपी पद्धत आहे जी तुम्ही आधी कधी बघितली नसेल.
सामान्य लसूण सोलण्याचा त्याचा एक गाठा घेतला जातो. तो तोडून त्यातील कळ्या वेगवेगळ्या केल्या जातात. त्यानंतर एक एक कळी सोलली जाते. मात्र, या व्हिडिओत एक वेगळीच ट्रिक दाखवण्यात आली आहे. सगळ्यात आधी लसणाचा आतील भाग काढून लसणाचा गाठा आतून पोकळ केला गेला. त्यानंतर चिमट्याच्या मदतीने लसूण सोलण्यात आला.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ kendall.s.murray नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ८.३ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे.