बुडापासून कापलं होतं झाड, पण दुसऱ्या झाडाने त्याला मरू दिलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 01:04 PM2021-09-13T13:04:59+5:302021-09-13T13:06:37+5:30

या फोटोत दोन झाडं दिसत आहेत. यातील एक झाड बुडापासून कापलं आहे. तरी सुद्धा ते झाड जिवंत आहे.

Amazing nature this tree picture goes viral tweeple says its a true friendship | बुडापासून कापलं होतं झाड, पण दुसऱ्या झाडाने त्याला मरू दिलं नाही!

बुडापासून कापलं होतं झाड, पण दुसऱ्या झाडाने त्याला मरू दिलं नाही!

Next

सोशल मीडियावर एक हैराण करणारा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो बघून लोक म्हणत आहे की, मनुष्याने निसर्गापासून काहीतरी शिकलं पाहिजे. तर अनेकांनी लिहिलं की, ही निसर्गाची किमया आहे. या फोटोत दोन झाडं दिसत आहेत. यातील एक झाड बुडापासून कापलं आहे. तरी सुद्धा ते झाड जिवंत आहे. कारण त्याला दुसऱ्या झाडाने आधार दिला. 

हा फोटो ट्विटरवर @RebeccaH2030 ने शेअर केला. त्यांनी कॅप्शनला लिहिलं की, 'बारीक झाडाला बऱ्याच वर्षाआधी कापलं होतं. तेव्हापासून मोठ्या झाडाने त्याला आधार दिला आहे. आणि त्यामुळे ते झाड जिवंत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या फोटोला ९७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत तर १७ हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. त्यासोबतच हजारो यूजर्सनी यावर कमेंट्सही केल्या आहे. अनेकांनी लिहिलं की, मनुष्यांनी निसर्गाकडून शिकलं पाहिजे.
 

 

Web Title: Amazing nature this tree picture goes viral tweeple says its a true friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.