Video: अप्रतिम कलाकृती... २ कोटींहून जास्त व्ह्यूज; 'पारले जी' बिस्किटाचं राम मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:26 PM2024-01-18T14:26:16+5:302024-01-18T14:26:58+5:30

अयोध्या नगरी राम भक्तीमय झाली असून सोशल मीडियावरही राम मंदिराचा फीव्हर दिसून येत आहे.

Amazing work of art... More than 2 crore views G Biskit's of Ayodhya ram Mandir | Video: अप्रतिम कलाकृती... २ कोटींहून जास्त व्ह्यूज; 'पारले जी' बिस्किटाचं राम मंदिर

Video: अप्रतिम कलाकृती... २ कोटींहून जास्त व्ह्यूज; 'पारले जी' बिस्किटाचं राम मंदिर

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या २-३ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साह असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ जानेवारी रोजी देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशवीसीयांना केलं आहे. जगभरातील भारतीय नागरिक या सोहळ्यात स्वत:ला सहभागी करुन घेत आहेत. तर, मार्केटमध्येही राम मंदिर प्रतिकृती, ध्वज, विविध साहित्य व वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत आहे. डोंबवलीतील रामभक्तांनी चक्क पुस्तकांचा वापर करुन राम मंदिर प्रतिकृती उभारली आहे. तर, आता पारले बिस्किटांचा वापर करुन राम मंदिरांची प्रतिकृती निर्माण केल्याचं दिसत आहे.

अयोध्या नगरी राम भक्तीमय झाली असून सोशल मीडियावरही राम मंदिराचा फीव्हर दिसून येत आहे. राम मंदिर व संबंधित व्हिडिओ, गाणी, पोट्रेट आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून राम मंदिर व प्रभू श्रीराम यांचे दर्शन घडत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, चक्क पारले जी बिस्कीटचा वापर करुन अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती बनवल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालमधील युवकाने ही कलाकृती बनवली आहे. 

युवकाने २० किलो पारले जी बिस्किटांचा उपयोग करुन राम मंदिर प्रतिकृती निर्माण केली आहे. विशेष म्हणजे मंदिराची हुबेहुब प्रतिकृती या बिस्कीटांमधून दिसत आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर या कलाकृतीचं व बनवणाऱ्या युवकांचही जोरदार कौतुक केलं जातंय. 

सोशल मीडियावरील @durgapur_times नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. २२. ५ मिलियन्स नेटीझन्सने हा व्हिडिओ पाहिला असून २६ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आहेत. तसेच, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, २० किलो पारले जी बिस्कीटांचा वापर करुन ही कलाकृती बनविण्यात आली आहे. अनेकांनी या व्हिडिओनंतर कलाकाराचं कौतुक केलंय. त्यासोबतच, अशाप्रकारे अन्न वाया घालवू नये, असा सल्लाही युवकाला देण्यात आला आहे. 
 

Web Title: Amazing work of art... More than 2 crore views G Biskit's of Ayodhya ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.