बाबो! Amazon ने चुकून ९ लाखाचा कॅमेरा विकला ६५०० रूपयात, ग्राहक गॅसवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:00 PM2019-07-22T13:00:45+5:302019-07-22T16:05:24+5:30

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेजॉनच्या वेबसाइटवरून तुम्हीही कधी ना कधी काही शॉपिंग केली असेलच.

Amazon glitch allows customer to purchase 9 lakh camera for just 6500 news goes viral | बाबो! Amazon ने चुकून ९ लाखाचा कॅमेरा विकला ६५०० रूपयात, ग्राहक गॅसवर?

बाबो! Amazon ने चुकून ९ लाखाचा कॅमेरा विकला ६५०० रूपयात, ग्राहक गॅसवर?

Next

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेजॉनच्या वेबसाइटवरून तुम्हीही कधी ना कधी काही शॉपिंग केली असेलच. वेगवेगळ्या सेल्सचीही तुम्ही वाट पाहिली असेल. नुकताच अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर प्राइम डे सेल झाला. १५ ते १६ जुलै दरम्यान हा सेल होता. या सेलमध्ये एक धमाकेदार किस्सा घडला. तो म्हणजे कंपनीने तब्बल ९ लाख रूपयांचा कॅमेरा केवळ ६५०० रूपयांना विकला.

अमेरिकेतील एका रेडीट यूजरने सांगितले की, त्याला ३ हजार डॉलरचा कॅमेरा ९४ डॉलरमध्ये मिळाला. तर दुसऱ्या एका ग्राहकाने रेडीटवर सांगितले की, १६००० डॉलरच्या वस्तू त्याला ८०० डॉलरमध्ये मिळालं. आणखी यूजरने सांगतिले की, त्याला १३००० डॉलरपेक्षा अधिक किंमतीचा कॅमेरा केवळ १०० डॉलरमध्ये मिळाला. 

ग्राहकाने लगेच कंपनीचे आभारही मानले. पण जेव्हा कंपनीला या चुकीबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ऑफर बंद केली. आता ज्या ग्राहकांचा हा फायदा झाला आहे, त्यांना हा प्रश्न पडला आहे की, कंपनी त्यांच्या वस्तू डिलिव्हर करणार की नाही?

Web Title: Amazon glitch allows customer to purchase 9 lakh camera for just 6500 news goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.