बोंबला! आर्टिस्टने विस्फोटक लावून उडवली लक्झरी लॅम्बॉर्गिनी कार, कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:19 PM2022-02-24T17:19:13+5:302022-02-24T17:21:39+5:30
अमेरिकेतील या आर्टिस्टने क्रिप्टो करन्सीला विरोध दर्शवण्यासाठी जवळपास ५ कोटी रूपये किंमतीची लॅम्बॉर्गिनी कार विस्फोटक लावून उडवली.
सोशल मीडियावर कधी कधी असे काही व्हिडीओ बघायला मिळतात, जे बघून हैराण व्हायला होतं. सोबतच आपण विचारातही पडतो. सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तोही असाच हैराण करणारा आहे. एका कॉन्सेप्चुअल आर्टिस्टने विरोधाची एक अशी पद्धत निवडली आहे, ज्याबाबत वाचून सगळेच चक्रावून गेले आहेत. अमेरिकेतील या आर्टिस्टने क्रिप्टो करन्सीला विरोध दर्शवण्यासाठी जवळपास ५ कोटी रूपये किंमतीची लॅम्बॉर्गिनी कार (Lamborghini) विस्फोटक लावून उडवली.
या आर्टिस्टला Shl0ms नावाने ओखळलं जातं. तो म्हणाला की, क्रिप्टोच्या माध्यमातून जो लवकरात लवकर श्रीमंत होण्याचं कल्चर सुरू झालं आहे, त्याला विरोध दर्शवण्यासाठी त्याने गेल्या महिन्यात अमेरिकेत एका अज्ञात ठिकाणी सेकंड हॅंड लक्झरी लॅम्बॉर्गिनी कार स्फोटकं लावून उडवली. आता लॅम्बॉर्गिनी ह्यूराकनचे जळालेला तुकडे या आठवड्याच्या शेवटी NFT च्या रूपात लिलाव केले जातील. या आर्टिस्टनुसार, क्रिप्टो टेक्नॉलॉजीचा वापर इतर लाभदायक उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. पण त्याद्वारे काही भयानक गोष्टी केल्या जात आहेत.
𒄭/𒐤
— 𒐪𒐪𒐪 𒐪𒐪𒐪 𒐪𒐪𒐪 𒐪𒐪𒐪 𒐪𒐪𒐪 𒐪𒐪𒐪 (@SHL0MS) February 17, 2022
𝚒𝚗𝚝𝚛𝚘𝚍𝚞𝚌𝚒𝚗𝚐 $CAR:
𝟿𝟿𝟿 𝚎𝚡𝚚𝚞𝚒𝚜𝚒𝚝𝚎𝚕𝚢 𝚏𝚒𝚕𝚖𝚎𝚍 𝚏𝚛𝚊𝚐𝚖𝚎𝚗𝚝𝚜
𝚘𝚏 𝚊 𝚍𝚎𝚝𝚘𝚗𝚊𝚝𝚎𝚍 𝙻𝚊𝚖𝚋𝚘𝚛𝚐𝚑𝚒𝚗𝚒 𝙷𝚞𝚛𝚊𝚌𝚊𝚗
𝚏𝚞𝚕𝚕 𝚎𝚡𝚙𝚕𝚘𝚜𝚒𝚘𝚗 𝚏𝚘𝚘𝚝𝚊𝚐𝚎 +
𝚊𝚞𝚌𝚝𝚒𝚘𝚗 𝚍𝚛𝚘𝚙 𝟶𝟸.𝟸𝟻.𝟸𝟸 ➞ https://t.co/AV6YAO4wlP
͏ pic.twitter.com/wRIFP2M4kp
फॉर्च्यूनच्या एका रिपोर्टनुसार, शोम्स नावाच्या या आर्टिस्टने ज्या लॅम्बॉर्गिनीला उडवलं तिचे ९९९ तुकडे लिलावात विकले जाणार आहेत. ज्यातील ८८८ जळालेले तुकडे एनएफटीच्या रूपात विकले जातील. तर १११ तुकडे एका अज्ञात खरेदीदारासाठी आणि कलाकारांच्या टीमसाठी ठेवले गेले आहेत.
NFT काय आहे?
क्रिप्टो करन्सी एक व्हर्चुअल करन्सी आहे. ती नोट किंवा नाण्याप्रमाणे हातात घेता येत नाही. ती डिजिटल असते. तेच NFT चा अर्थ नॉन फंजिबल टोकन आहे. हे बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टो करन्सी सारखंच एक क्रिप्टो टोकन आहे. हे डिजिटल आहे. जे वस्तूची व्हॅल्यू जनरेट करते.