"मला बोलू द्या ना", मराठमोळ्या बापलेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही म्हणाल वाह, क्या बात है...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 04:06 PM2020-10-20T16:06:51+5:302020-10-20T16:14:43+5:30

Viral Video Marathi : ॉहा चिमुरडा गायनाचा रियाज करत आहे. वडिल पेटी वाजवत सूर लावत असताना चिमुरडा गाणं म्हणण्याची घाई करत आहे. 

Amitabh Bachchan tweeted Video of father and son who singing togher | "मला बोलू द्या ना", मराठमोळ्या बापलेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही म्हणाल वाह, क्या बात है...

"मला बोलू द्या ना", मराठमोळ्या बापलेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही म्हणाल वाह, क्या बात है...

Next

सोशल मीडियावर सध्या या बाप लेकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही गायनाच्या रियाजाचे किंवा जुगलबंदीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण असा व्हिडीओ पाहिला नसेल.  तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता वडील आणि चिमुरडा हे दोघे गायनाचा सराव करत आहेत. या चिमुरड्याचा उत्साह पाहण्यासारखा आहे. इतक्या लहान वयात वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत हा चिमुरडा गायनाचा रियाज करत आहे. वडिल पेटी वाजवत सूर लावत असताना चिमुरडा गाणं म्हणण्याची घाई करत आहे. 

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. या मराठमोळ्या बापलेकाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. वडील गाणं म्हणत असताना 'मलाही बोलू द्या' असं म्हणणाऱ्या चिमुरड्याने अनेकांनी मनं जिंकून घेतली आहेत. सावकाश बोला असं म्हणत हा चिमुरडा वडिलांच्या मागे मागे सूर लावत आहे. Video: गावात विकास झालाय का? असं रिपोर्टरने विचारलं, अन् आजोबांनी दिलेलं उत्तर झालं व्हायरल

Child is the Father of Man !. असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत ३८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे, तर   ५ हजारापेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे. हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अत्यंत उत्साहात, हातवारे करत  हा चिमुरडा गाणं म्हणत आहे. लाखो लोकांनी  हा व्हिडीओ पाहिला आहे. नशीबाने थट्टा कशी मांडली! सुवर्णपदक विजेती तरूणी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी करतेय 'हे' काम 

Web Title: Amitabh Bachchan tweeted Video of father and son who singing togher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.