आता बिंधास्त पाणीपुरी खा! पाणीपुरी चाहत्यांसाठी जबरदस्त मशीन; पाहा कसं काम करतं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 03:14 PM2020-11-17T15:14:01+5:302020-11-17T15:46:11+5:30

ही मशीन लावल्यानंतर कोरोना काळातही लोकांना पाणीपुरी खाण्याचा मनसोक्त आनंद घेता येत आहे.

Amritsar city a machine made for panipuri golgappa lovers in coronavirus pandemic know how panipuri machine | आता बिंधास्त पाणीपुरी खा! पाणीपुरी चाहत्यांसाठी जबरदस्त मशीन; पाहा कसं काम करतं

आता बिंधास्त पाणीपुरी खा! पाणीपुरी चाहत्यांसाठी जबरदस्त मशीन; पाहा कसं काम करतं

Next

कोरोनाकाळात पाणीपूरी किंवा बाहेरच्या गाड्यावर विक्री होत असलेले कोणतेही पदार्थ खाण्यासाठी लोकांना धास्ती वाटत होती. कारण  कोरोनाची माहामारी आल्यानंतर लोक खाण्यापिण्याच्या सवयींबाबत आणि वैयक्तक स्वच्छतेबाबत खूप जागरूक झाले आहेत. आता  पाणी विक्रेत्यांनी सुद्धा त्यांचा पॅटर्न बदलेला तुम्हाला दिसून येईल. पाणीपुरी चाहत्यांसाठी एक खास मशिन लावण्यात आलं आहे. या मशिनने अनेकांना आकर्षित केलंय. ही मशीन लावल्यानंतर कोरोना काळात आता लोकांना पाणीपुरी खाण्याचा मनसोक्त आनंद घेता येत आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी अमृतसरमध्ये एक असा पाणीपुरीवाला समोर आला आहे, जो स्पर्श केल्याशिवाय पाणीपुरी बनवतो. मशीनद्वारे ते पाणीपुरीसाठी लागणारं 6 प्रकारचं पाणी तयार करतो. (Photo: News18)

कोरोनापासून बचावासाठी अमृतसरमध्ये एक असा पाणीपुरीवाला समोर आला आहे, जो  हात न लावता  पाणीपुरी बनवतो. मशीनद्वारे ते पाणीपुरीसाठी लागणारं ६ प्रकारचं पाणी तयार करतो. अमृतसरमधील शास्त्री मार्केटमध्ये पाणीपुरीची ही मशिन लावण्यात आली आहे. या मशिनमुळे ग्राहकांना पाणीपुरी बनवणाऱ्याच्या हातून पाणीपुरीचं पाणी टाकून घेण्याची गरज लागणार नाही. मशीनद्वारेच ग्राहक स्वत: हवं असलेलं ६ प्रकारचं पाणी टाकून पापीपूरीचा आनंद घेऊ शकतात. नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ

दुकानाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात काम पूर्णपणे बंद होतं. पण आता अनलॉकमध्ये पाणीपुरीचं मशीन लावल्यानंतर, पुन्हा एकदा ग्राहकांची मोठी गर्दी होत असून पंजाबमधील हे अशा प्रकारचं पहिलंच मशिन आहे. यापूर्वी अशा मशिनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या मशीनमुळे ग्राहकांना बाहेरचं खातानाही कोणतीच धास्ती वाटत नाही. स्वच्छता या ठिकाणी दिसून येते. म्हणून  लोक कोरोनाची भीती न बाळगळता या ठिकाणी पाणीपूरी खाण्याचा आनंद घेऊ शकतात.  नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ

Web Title: Amritsar city a machine made for panipuri golgappa lovers in coronavirus pandemic know how panipuri machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.