80 वर्षीय वृद्धाचे वडाच्या झाडात चहाचे हॉटेल; आनंद महिंद्रांनी ठेवले हॉटेलचे अनोखे नाव...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 04:12 PM2023-07-25T16:12:50+5:302023-07-25T16:13:49+5:30
Tea Shop Under Tree In Amritsar : आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
Temple of Tea Service Viral Video : महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. त्यांचे लाखो चाहते त्यांच्या पोस्टची वाट पाहत असतात. त्यांनी एखादी पोस्ट करताच ती व्हायरल होते. आता त्यांचे नवीन ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. आता आनंद यांनी अमृतसरमधील एका छोट्याशा चहाच्या हॉटेलचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
हे सामान्य चहाचे हॉटेल नाही, तर एका मोठ्या वडाच्या झाडात थाटलेलं हॉटेल आहे. मोठ्या वडाच्या झाडात एका 80 वर्षीय वृद्धाने हे चहाचे छोटेसे हॉटेल सुरू केले आहे. त्या वृद्धाच्या साधेपणामुळे फक्त आनंद महिंद्राच नाही, तर लाखो नेटीझन्सचेही मन जिंकले आहे. म्हणूनच आनंद महिंद्रा यांनी या चहाच्या हॉटेलला 'चाय सेवा का मंदिर' (चहा सेवेचे मंदिर) नाव दिले आहे.
There are many sights to see in Amritsar. But the next time I visit the city, apart from visiting the Golden Temple, I will make it a point to visit this ‘Temple of Tea Service’ that Baba has apparently run for over 40 years. Our hearts are potentially the largest temples.… pic.twitter.com/Td3QvpAqyl
— anand mahindra (@anandmahindra) July 23, 2023
हा हृदयस्पर्षी व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, अमृतसरमध्ये पाहण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत. पण, पुढच्या वेळेस मी जेव्हा अमृतसरमध्ये जाईन, तेव्हा सुवर्ण मंदिरासोबतच या चहा सेवेच्या मंदिरातही जाईन. हे बाबा 40 वर्षांहून अधिक काळापासून हे हॉटेल चालवत आहेत.
आनंद महिंद्रा यांनी 23 जुलै रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला 3 लाख 78 हजार व्ह्यूज आणि 12 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.