चिनी अ‍ॅपवर भाष्य करणारी अमुल गर्लची ‘ती’ जाहिरात प्रचंड व्हायरल; नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 11:39 PM2020-06-30T23:39:11+5:302020-06-30T23:39:42+5:30

सुप्रसिद्ध ब्रँड अमुल बटरची ही जाहिरात सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत

Amul advertisement commenting on Chinese app goes viral in social media | चिनी अ‍ॅपवर भाष्य करणारी अमुल गर्लची ‘ती’ जाहिरात प्रचंड व्हायरल; नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा

चिनी अ‍ॅपवर भाष्य करणारी अमुल गर्लची ‘ती’ जाहिरात प्रचंड व्हायरल; नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा

googlenewsNext

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने टिकटॉकसह ५९ अ‍ॅपवर देशात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे चिनी अँप आता गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. तसेच देशातील युजर्ससाठी हे अ‍ॅप बंद झाले आहेत. सध्याच्या भारत आणि चीन तणावावर भाष्य करण्यासाठी अमुलच्या क्रिएटिव्ह टीमनं भन्नाट जाहिरात केली आहे.

सुप्रसिद्ध ब्रँड अमुल बटरची ही जाहिरात सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत, यामध्ये अमुल गर्ल फ्रिजमधून बटर दाखवत STik With This Stok असं सांगत आहे. त्यासोबतच Amul We Chat over tea असाही उल्लेख करण्यात आला आहे. भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर अमुलच्या या जाहिरातीतून प्रसिद्ध चिनी अ‍ॅप Tiktok आणि WeChat यांचा उल्लेख करत भारतीय उत्पादनांना प्राधान्य द्या असा संदेश दिला आहे.

याआधीही अमुलच्या ट्विटर हँडलने Exit The Dragon? असं वाक्य वापरुन एक जाहिरात केली होती. या जाहिरातीला सोशल मीडियात प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ट्विटरने अचानक अमुलचं अधिकृत ट्विटर हँडल ब्लॉक केले होते. कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय ट्विटर हँडल ब्लॉक केल्याने अमुल व्यवस्थापनही चकीत झाले होते. त्यानंतर ट्विटरने आमची भूमिका समजून घ्यायला हवी होती असं सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पुन्हा एकदा अमुलच्या या ताज्या जाहिरातीची नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान, देशात बॅन केलेल्या ५९ चिनी अ‍ॅप्समुळे खासगी डेटा व खासगीपण यांच्यावर आक्रमण होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने या चीनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाने निवडणूक प्रचार कॅम्पेनमध्ये लाँच केलेल्या नमो अ‍ॅपवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. ''देशातील 130 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे, म्हणून सरकारने ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अ‍ॅपदेखील बंद केले पाहिजे,'' असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

 

Web Title: Amul advertisement commenting on Chinese app goes viral in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.