नदीत वाहून चाललं होतं हत्तीचं पिल्लू; आईनं असं वाचवलं; Video पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 02:54 PM2022-04-17T14:54:48+5:302022-04-17T14:55:47+5:30

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत तब्बल 15 लाख हून अधिक लोकांनी पाहिला आहे.

An elephant calf was carried in the river; The mother saved it; Watch the video and you too will salute | नदीत वाहून चाललं होतं हत्तीचं पिल्लू; आईनं असं वाचवलं; Video पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल 

नदीत वाहून चाललं होतं हत्तीचं पिल्लू; आईनं असं वाचवलं; Video पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल 

Next

हत्तींशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हत्ती हा अतिशय शांत प्राणी असल्याने इंटरनेट युजर्सना त्यांच्याशी संबंधित व्हिडिओ बघायला अत्यंत आवडते. सध्या हत्तीशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, नदिच्या प्रवाहात हत्तीचे एक पिल्लू वाहून जाताना दिसत आहे. यावेळी त्याची  आई त्याला ज्या पद्धतीने वाचवते, ते पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल.

नदीच्या प्रवाहात वाहून जात होतं हत्तीचं पिल्लू - 
आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता, की हत्तींचा एक कळप नदी ओलांडून जात आहे. या दरम्यान मोठे हत्ती अत्यंत सहज ही नदी ओलांडून जातात. मात्र, याच वेळी नदीचा प्रवाह अधिक असल्याने हत्तीचे एक पिल्लू वाहून जाऊ लागते. यावेळी, हे पाहून त्याची आई त्याच्या मागे धावते आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आणखी एक हत्ती येतो आणि दोघे मिळून या पिल्लाला बाहेर काडतात. महत्वाचे म्हणजे, पाण्याचा प्रवाह एवढा अधिक होता की, हे पिल्लू या प्रवाहात बरेच दूरवर वाहत गेले होते.

आईच्या प्रेमानं मनं जिंकली -
या व्हिडिओने युजर्सची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये आईचे प्रेम आणि हत्तींची एकी पाहून युजर्स इंप्रेस झाले आहेत. हा व्हिडिओ elephants_.world नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत तब्बल 15 लाख हून अधिक लोकांनी पाहिला आहे.
 

Web Title: An elephant calf was carried in the river; The mother saved it; Watch the video and you too will salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.