VIDEO : स्कूबा डायविंग करण्यासाठी समुद्रात गेले होते दोन मित्र, समोर आला 23 फूट लांब अॅनाकोंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 11:04 AM2022-07-30T11:04:03+5:302022-07-30T11:06:19+5:30
Giant Anaconda In Sea Video: दोन लोक स्कूबा डायविंगसाठी समुद्रात उतरले आहेत आणि त्यांच्यासमोर विशाल अॅनाकोंडा येतो. व्हिडीओत इतक्या मोठ्या अॅनाकोंडाला बघून तुम्हालाही घाम फुटेल.
Giant Anaconda In Sea Video: सोशल मीडियावर अनेक असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे हैराण करणारे असतात. तुम्ही अॅनाकोंडा नेहमी सिनेमात पाहिला असेल. अॅनाकोंडाला जगातील सर्वात विशाल आणि खतरनाक साप मानला जातो. अशात कल्पना करा की, जर अॅनाकोंडा तुमच्या समोर आला तर तुम्हाला कसं वाटेल? काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोन लोक स्कूबा डायविंगसाठी समुद्रात उतरले आहेत आणि त्यांच्यासमोर विशाल अॅनाकोंडा येतो. व्हिडीओत इतक्या मोठ्या अॅनाकोंडाला बघून तुम्हालाही घाम फुटेल. हा व्हिडीओ ब्राझीलमधील असल्याचं सांगितलं जात आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोन लोक डायविंग सूट घालून पाण्याच्या आत आहेत. त्यांच्या हातात कॅमेरा आहे. ते जसे आत जातात त्यांना हिरव्या रंगाचा विशाल अॅनाकोंडा दिसतो. अॅनाकोंडा हळूहळून पुढे सरकत आहे. आधी तर दोघेही अॅनाकोंडापासून दूर राहतात. पण नंतर ते त्याच्याजवळ जाऊन त्याचं शूट करतात. अॅनाकोंडा लांबलचक जीभ काढताना दिसत आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, अॅनाकोंडा पुढे निघू जातो. तो कुणावरही हल्ला करत नाही. हा अॅनाकोंडा साधारण 23 फुटांपेक्षा जास्त लांब असल्याचं आणि त्याचं वजन अंदाजे 100 किलो असल्याचं सांगितलं जात आहे. डायविंग करणाऱ्या लोकांनी सांगितलं की, काही वेळ तो एकाच ठिकाणी थांबला. पण नंतर गपचूप तिथून निघून गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 46 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तेच हजारो लाइक्स मिळाले आहेत.