आनंद महिंद्रांचा आदर पुनावालांना सल्ला; कोरोनाला हरवण्यासाठी तयार करा "Big V" लस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 01:54 PM2020-08-04T13:54:11+5:302020-08-04T14:04:59+5:30
अमिताभ बच्चन बरे होऊन आपल्या घरी परतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना बिग V लस तयार करण्याचं आवाहन केलं आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा करत सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्यात असं कॅप्शन लिहिले होतं की, तुमच्याकडे जी लस आहे ती इतर कोणाकडेही नाही. ती लस म्हणजे बिग V. ही इनबिल्ट आणि ऑर्गेनिक आहे. आता अमिताभ बच्चन बरे होऊन आपल्या घरी परतल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना बिग V लस तयार करण्याचं आवाहन केलं आहे.
Welcome back @SrBachchan As I had said, you possessed an inbuilt vaccine codenamed the Big V. Now we need @adarpoonawalla to find a way to extract it from you, manufacture it & give us all a dose...😊 https://t.co/8aP9o2IzA9
— anand mahindra (@anandmahindra) August 2, 2020
अभिताभ यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून लगेचच डिस्चार्ज देण्यात आला. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केले की जसं मी आधी म्हणालो होतो'. ''तुमच्याकडे इनबिल्ट लस बिग वी आहे. '' याच ट्वीटमध्ये आनंद महिंद्रा यांनी @adarpoonawalla यांना टॅग करत अशी लस निर्माण करून आम्हाला एक डोस द्या.'' असं म्हटलं आहे.
Haha! good one @anandmahindra, my scientists are working on it! and great to have you back, @SrBachchan. https://t.co/1IO9BbG5ts
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 2, 2020
आदर पुनावाला हे सीरम इंस्टीस्टूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. जगभरातील सगळ्यात मोठ्या लस निर्मात्यांमध्ये यांचा समावेश होतो. त्यांनी महिंद्रा ग्रुपला ''माझे वैज्ञानिक यावर काम करत आहेत.'' असं उत्तर दिलं असून अमिताभ बच्चन यांचे स्वागत केले आहे.
१ नंबर जुगाड! पठ्ठ्या लॅपटॉपला अर्ध अॅपल लावून करतोय काम; आनंद महिंद्रा म्हणाले......
Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक