Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 09:06 PM2022-10-07T21:06:32+5:302022-10-07T21:07:25+5:30

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्वतःच्याच कंपनीची एक नवीन गाडी खरेदी केली आहे.

Anand Mahindra bought a new car, said - suggest a good name for it | Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा...

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा...

googlenewsNext

Anand Mahindra New Car: सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेले महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी स्वत:साठी नवीन कार खरेदी केली आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांच्या नवीन कारची चावी घेताना एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी नेटकऱ्यांना, गाडीसाठी चांगले नाव सुचवण्याचे आवाहन केले. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचे मालक आनंद महिंद्रा आपल्या ट्विट्समुळे नेहमी चर्चेत राहतात. यावेळी त्यांचे ट्विट इतर कोणाशी संबंधित नसून स्वत:शी संबंधित आहे. त्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या कंपनीची SUV खरेदी केली आहे. Mahindra Scorpio-N त्यांच्या कार कलेक्शनमध्ये सामील झाली आहे. त्यांनी याच गाडीसोबत एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ते शोरुमच्या कर्मचाऱ्याकडून चावी स्वीकारताना दिसत आहेत.

नेटकऱ्यांना नाव सुचवायला सांगितले
आनंद महिंद्रा यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये महिंद्रा लाल रंगाच्या स्कॉर्पिओ एन जवळ हातात पुष्पगुच्छ घेऊन दिसत आहेत. त्यांच्या शेजारी आणखी एक व्यक्ती गाडीची चावी घेऊन उभा आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शन दिले की, 'माझ्यासाठी मोठा दिवस आहे. मला Scorpio-N मिळाली. गाडीसाठी चांगले नाव सूचवा.' 

काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाली
विशेष म्हणजे, आनंद महिंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्राची नवीन Scorpio-N एसयूव्ही लॉन्च केली आहे. या गाडीची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 23.90 लाख रुपयांपर्यंत जाते. आनंद महिंद्रा यांनी या गाडीचे टॉप व्हेरियंट खरेदी केले आहे.

Web Title: Anand Mahindra bought a new car, said - suggest a good name for it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.