जबरदस्त! जिंकणं सोपं नसतं...; आनंद महिद्रांनी नीरज चोप्राचा शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 05:35 PM2023-01-18T17:35:42+5:302023-01-18T17:35:50+5:30
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमधील ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकूण इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमधील ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकूण इतिहास घडवणाऱ्या नीरज चोप्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट करुन नीरजचे कौतुक केले आहे. हा व्हिडीओ नीरजचा वर्कआउट दरम्यानचा आहे.
चोप्राच्या "विलक्षण, पाठीशी घालवणारा प्रयत्न" ची आठवण करून दिली आणि टिप्पण्या विभागात कौतुकाचा वर्षाव झाला. महिंद्रा अँड महिंद्राच्या चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नीरज चोप्रा सराव करत असल्याचा दिसत आहे.
२०२३ मध्ये स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांसाठी नीरज इंग्लंडमध्ये ट्रेनिंग घेत आहे. ही व्हिडीओ ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी नीरजचे कौतुक केले आहे. "एखाद्या मोठ्या स्पर्धेत विजय मिळवणं कोणत्याच खेळाडूसाठी सोपं नसतं" अशी कॅप्शन महिंद्रा यांनी या व्हिडीओला दिली आहे.
हा व्हिडीओ सुरुवातीला Beau Throws नावाच्या खात्यावरुन शेअर केला होता. या व्हिडीओला 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Just watching the workout routine of @Neeraj_chopra1 reminds me of the extraordinary, back-breaking effort that lies ‘behind-the-scenes’ of any victory. Nothing comes easy… pic.twitter.com/cgMRcZaDkq
— anand mahindra (@anandmahindra) January 17, 2023
एका यूजरने लिहिले, “नीरजसाठी खूप आदर. त्याच्या ध्येयावर त्याचा फोकस आहे. त्याला मीडिया बाइट्स आणि प्रमाणीकरणाची इच्छा नाही. त्याला फक्त स्वारस्य नाही. तो त्याच्या कामगिरीत सुधारणा करण्याशिवाय आणि नवीन रेकॉर्ड इतके सातत्याने प्रयत्न करतो."अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शुभमन गिलचे खणखणीत शतक; मोडला लोकेश राहुलचा मोठा विक्रम, टीम इंडियालाही सावरले
नीरज चोप्रा सध्या UK च्या Loughborough University मध्ये आहे तिथे तो 2023 च्या स्पर्धांसाठी प्रशिक्षण घेत आहे. तो यंदाच्या जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे.