रिअल लाईफ रँचोला भेटले आनंद महिंद्रा, त्यानंतर झालेली गोष्ट वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 01:48 PM2022-04-08T13:48:45+5:302022-04-08T13:53:33+5:30

यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी वास्तविक जीवनातील फुंसुक वांगडू (Phunsuk Wangdu) म्हणजेच सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) आणि त्यांची पत्नी गीतांजली यांच्यासोबतचा फोटो शेअर केला तसंच मीटिंगमध्ये काय घडलं याचे थोडक्यात संकेतही दिले.

anand mahindra meet sonam wangchuk and his wife geetanjali photo goes viral on internet | रिअल लाईफ रँचोला भेटले आनंद महिंद्रा, त्यानंतर झालेली गोष्ट वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

रिअल लाईफ रँचोला भेटले आनंद महिंद्रा, त्यानंतर झालेली गोष्ट वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

googlenewsNext

सुमारे दशकभरापूर्वी आलेला बॉलिवूड सिनेमा 3 इडियट्स (3 Idiots Movie) हा हिट ठरला होता. यात खऱ्या जीवनातील इनोव्हेटरची (Real Life Innovator) म्हणजेच सोनम वांगचुक यांची कथा दाखवण्यात आली होती. तर दुसरीकडे आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आहेत, जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि कॉर्पोरेट जगतात नाविन्यपूर्ण आयडियांसाठीही ओळखले जातात. इनोव्हेशनच्या जगातील अशा दोन व्यक्तींची भेट होणं हा मोठा योगायोग आहे. हा योगायोग घडला आणि त्याचा निकालही खूप आनंददायी होता.

महिंद्रा समूहाला नव्या उंचीवर नेणारे उद्योगपती आनंद महिंद्रासोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत करून बऱ्याचदा ते बातम्यांमध्येही झळकतात. यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी वास्तविक जीवनातील फुंसुक वांगडू (Phunsuk Wangdu) म्हणजेच सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) आणि त्यांची पत्नी गीतांजली यांच्यासोबतचा फोटो शेअर केला तसंच मीटिंगमध्ये काय घडलं याचे थोडक्यात संकेतही दिले.

आनंद महिंद्रा यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तेजस्वी सोनम वांगचुक आणि त्यांची तितकीच हुशार जोडीदार गीतांजली यांना भेटण्याचा अनुभव अतिशय छान होता! त्यांच्या विद्यापीठाच्या प्रकल्पाबाबत त्या दोघांशी चर्चा झाली. 3 इडियट्स सिनेमाचा नायक फुंसुक वांगडू हे पात्र सोनमवरुन प्रेरित होतं, तरीही या पात्राने सोनमला फारसा न्याय दिला नाही. ते खऱ्या अर्थाने इनोव्हेटर आणि राष्ट्राची संपत्ती आहेत.

आनंद महिंद्रा यांचं म्हणणं अगदी खरं आहे. सोनम वांगचुक यांच्याबद्दल सिनेमात दाखवलं गेलं, त्यापेक्षा ते कितीतरी जास्त हुशार आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी Ice Stupa नावाची एक कृत्रिम हिमनदी तयार केली, जी प्रत्यक्षात हिवाळ्यातील बर्फ गोळा करते आणि उन्हाळ्यासाठी पाणी साठवते. 1988 मध्ये, त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखची (SECMOL) स्थापना केली, ज्याचं कॅम्पस स्वयंपाक, प्रकाश आणि उष्णता निर्माण करण्यासाठी फक्त सौर ऊर्जा वापरतं.

Web Title: anand mahindra meet sonam wangchuk and his wife geetanjali photo goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.