घोड्यावर स्वार होऊन शाळेत जाणाऱ्या मुलीचं आनंद महिंद्रांकडून कौतुक, बघा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 05:37 PM2019-04-08T17:37:20+5:302019-04-08T17:41:09+5:30
काही दिवसांपूर्वीच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियात मिहला मिश्रा नावाच्या एका ११ वर्षीय मुलीचं पत्र शेअर केलं होतं.
(Image Credit : TrendingAtoZ)
काही दिवसांपूर्वीच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियात मिहला मिश्रा नावाच्या एका ११ वर्षीय मुलीचं पत्र शेअर केलं होतं. या पत्रात महिकाने आनंद महिंद्रा यांना हॉर्नमुळे होणाऱ्या अडचणीबाबत सांगितले होते. त्यांचं तिने उपायही सांगितला होता. महिकानंतर आता आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये केरळच्या थ्रिसूरमध्ये राहणाऱ्या या मुलीला तुम्ही घोड्यावर स्वार होऊन शाळेत जाताना बघू शकता. एका रिपोर्टनुसार, ही मुलगी घोड्यावर स्वार होऊन १०वीची परीक्षा द्यायला जात आहे. शाळेत जाणाऱ्या या मुलीचा आत्मविश्वास पाहून आनंद महिंद्रा चकित झाले आहेत.
Brilliant! Girls’ education is galloping ahead...A clip that deserves to go viral globally. This, too, is #IncredibleIndiahttps://t.co/y1A9wStf7X
— anand mahindra (@anandmahindra) April 7, 2019
त्यांनी या मुलीचं भरभरून कौतुक तर केलंच. सोबतच त्यांनी हा व्हिडीओ अधिकाधिक शेअर करण्याचा आग्रह सुद्धा केलाय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. खरंच या मुलीच्या साहसाचं आणि हिंमतीचं कौतुक करावं लागेल.