१ नंबर जुगाड! पठ्ठ्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल लावून ऐटीत करतोय काम; आनंद महिंद्रा म्हणाले......

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 07:21 PM2020-08-03T19:21:55+5:302020-08-03T19:35:31+5:30

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलाने आपल्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल चिकटवलं आहे आणि त्याच लॅपटॉपवर तो काम करत आहे. 

Anand mahindra share funny twitter post where man working on laptop with half apple | १ नंबर जुगाड! पठ्ठ्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल लावून ऐटीत करतोय काम; आनंद महिंद्रा म्हणाले......

१ नंबर जुगाड! पठ्ठ्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल लावून ऐटीत करतोय काम; आनंद महिंद्रा म्हणाले......

Next

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक गमतीदार फोटो शेअर केला आहे आनंद महिद्रा यांनी आपल्या  ८० लाख फोलोअर्स असलेल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला आहे. तुम्ही असा जुगाड याआधी कधीही पाहिला नसेल. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलाने आपल्या लॅपटॉपला अर्ध अ‍ॅपल चिकटवलं आहे आणि त्याच लॅपटॉपवर तो काम करत आहे. 

जगभरातील सगळ्यात महागड्या ब्रॅण्ड्सपैकी अ‍ॅपल हे एक आहे. आनंद महिद्रांनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे की,अ‍ॅपल ब्रॅण्ड बनण्याची इच्छा असायला हवी. आनंद महिद्रांनी सांगितले की, मी माझ्या फोल्डरमध्ये काही वस्तू अशा ठेवतो. कारण काही मला खास ब्रॅण्डच्या वस्तू स्वतः जवळ ठेवायला आवडतात. आपली आपल्या आकांशा आणि स्वप्न जशी असतात तीच प्रत्यक्षात उतरतात.

या फोटोला सोशल मीडिया युजर्सनी खूप पसंती दर्शवली आहे. आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर ३ हजार ६०० पेक्षा जास्त लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.  अनेकदा आनंद महिंद्रा आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मजेशीर फोटो शेअर करतात. याशिवाय यांनी एका बाथरुमचा फोटो शेअर केला आहे.  तुम्हाला पहिल्यांदा  या फोटोतील गंमत लक्षात येणार नाही. पण निरिक्षण केल्यानंतर तुम्हाला या फोटोतील गंमत दिसून येईल. हा फोटो असून  अनेकांना सोशल मीडियावर हशा पिकला आहे. 

चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

पावसाळ्यात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन; रोगप्रतिकारकशक्ती होईल कमी, वेळीच सावध व्हा

Web Title: Anand mahindra share funny twitter post where man working on laptop with half apple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.