१ नंबर जुगाड! पठ्ठ्यानं एम्बॅसेडर कारला बैलगाडी बनवलं; अन् आनंद महिंद्रा म्हणाले...., पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 02:02 PM2020-12-24T14:02:59+5:302020-12-24T14:13:10+5:30
Trending Viral News in Marathi : अशी बैलगाडी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. बैलगाडी आणि एम्बॅसेडर कारचा असा जुगाड पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.
सोशल मीडियावर एकापेक्षा एक जुगाडाचे व्हिडीओ व्हायरल हो असतात. वेगवेगळ्या गोष्टींचे जुगाड करण्याच्या बाबतीत भारतातील लोक सगळयात पुढे आहेत. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या ट्विटर अकाऊंटवर वरून नेहमी वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असतात. आता सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी एका आगळ्या वेगळ्या बैलगाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. अशी बैलगाडी तुम्ही याआधी कधीही पाहिली नसेल. बैलगाडी आणि एम्बॅसेडर कारचा असा जुगाड पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.
I don’t think @elonmusk & Tesla can match the low cost of this renewable energy-fuelled car. Not sure about the emissions level, though, if you take methane into account... pic.twitter.com/C7QzbEOGys
— anand mahindra (@anandmahindra) December 23, 2020
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या हटके गाडीला पुढे बैल जोडले असून मागे बसण्याच्या जागेवर एम्बॅसेडर कार लावली आहे. पहिल्यांदा तुम्हाला वाटेल ही एम्बॅसेडर कार आहे. त्यानंतर तुम्हाला यामागचा आगळा वेगळा जुगाड कळून येईल. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, मला नाही वाटतं. एलन मस्क आणि टेस्ला या रीनूअबल एनर्जी-फ्यूल कारचा सामना करू शकतील. उत्सर्जनचा स्तर निश्चित नाही. जर तुम्ही मिथोनॉलचा विचार करत असाल तर. याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या
हा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर २३ डिसेंबला शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा व्हिव्हज मिळाले आहेत. २६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स व्हिडीओला मिळाले आहेत तर ३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केलं आहे. शेकडो लोकांनी या व्हिडीओवर गमतीदार रिएक्शन्स दिल्या आहेत. शाब्बास! पुण्याच्या २ शाळकरी पोरींनी केली कमाल; मंगळ आणि गुरूच्यामध्ये शोधले ६ लहान ग्रह