भन्नाट कल्पना! बीअर शॉपीवाल्याने केला असा काही जुगाड, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हायरल व्हिडीओ....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:38 PM2020-06-15T16:38:05+5:302020-06-15T16:39:21+5:30

काही दुकानदारांनी भन्नाट जुगाड केले आहेत. यातील एक आनंद महिंद्रा यांना फारच आवडलं. त्यांनी त्याचा व्हिडीओ शेअर केलाय.

Anand Mahindra share social distancing jugaad video by wine shopkeeper | भन्नाट कल्पना! बीअर शॉपीवाल्याने केला असा काही जुगाड, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हायरल व्हिडीओ....

भन्नाट कल्पना! बीअर शॉपीवाल्याने केला असा काही जुगाड, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हायरल व्हिडीओ....

Next

देशात अजूनही पूर्णपणे लॉकडाऊन उघडण्यात आलेलं नाही. पण दारूची दुकाने मात्र सुरू झाली आहेत. त्यामुळे या दुकानांसमोर तळीरामांची रांगच रांग बघायला मिळते. अशात लोकांना दूर ठेवण्यासाठी काही वेगळ्या लक्ष्मण रेषाही आखण्यात आल्या आहेत आणि त्यांना या लक्ष्मण रेषा पार न करण्याचा सल्ला देण्यात आलाय. काही दुकानदारांनी भन्नाट  जुगाड केले आहेत. यातील एक आनंद महिंद्रा यांना फारच आवडलं. त्यांनी त्याचा व्हिडीओ शेअर केलाय.

हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी 14 तारखेला शेअर केला होता. त्यांनी लिहिले होते की, 'हा व्हिडीओ फारच शेअर केलाय जातोय. यातून कॉन्टॅक्टलेस स्टोरफ्रन्टला प्रोत्साहन मिळतं'. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख लोकांनी पाहिलाय तर याला 8 हजार लाइक्स मिळाले आहेत. 

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती 'बीअर शॉप' समोर उभा आहे. पण कोरोना व्हायरसमुळे दुकानदाराने असा काही जुगाड केला आहे की, ज्याने तो ग्राहकाच्या संपर्कात न येताही त्याला वस्तू देऊ शकतो. त्यातूनच पैसेही घेता-देता येतात. दुकानदाराने एक भलामोठा पाईप काऊंटरसमोर लावलाय त्यातून तो बीअरच्या बॉटल देतो.

असाच जुगाड याआधीही काही किराणा दुकानांमध्ये वापरण्यात आला. पण त्यातून ते धान्य देत होते. पण दारूच्या दुकानात असा हा पहिलाच जुगाड असेल. काही असो सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांना आवडत आहे. 

Video : आरारारारा खतरनाक! महिलेने साडी नेसून केला असा काही स्टंट, बघणारे बघतच राहिले....

अगडबम : लॉकडाऊनमुळे त्याला बनवलं शहरातील सर्वात 'वजन'दार व्यक्ती!

Web Title: Anand Mahindra share social distancing jugaad video by wine shopkeeper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.