सगळ्यांसाठी लोकल सुरू होताच या प्रवाशाच्या फोटोनं जिकलं आनंद महिंद्रांचं मन; म्हणाले..... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 04:21 PM2021-02-03T16:21:26+5:302021-02-03T16:25:50+5:30

Trending Viral News in Marathi : हे दृश्य मुंबईच्या एका रेल्वे स्टेशनवरचे आहे. याठिकाणी लोकलमध्ये चढण्याआधी एका प्रवाश्यानं ट्रेनवर(Railway local) डोकं ठेवून नमस्कार केला आहे.  

Anand mahindra shared heart touching photo of mumbai local commuter worshipping train before boarding | सगळ्यांसाठी लोकल सुरू होताच या प्रवाशाच्या फोटोनं जिकलं आनंद महिंद्रांचं मन; म्हणाले..... 

सगळ्यांसाठी लोकल सुरू होताच या प्रवाशाच्या फोटोनं जिकलं आनंद महिंद्रांचं मन; म्हणाले..... 

googlenewsNext

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोनं आनंद महिंद्रांचे मन जिंकले आहे. हे दृश्य मुंबईच्या एका रेल्वे स्टेशनवरचे आहे. याठिकाणी लोकलमध्ये चढण्याआधी एका प्रवाश्यानं ट्रेनवर(Railway local) डोकं ठेवून नमस्कार केला आहे.  कोणीतरी हा फोटो कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला. दरम्यान राज्य सरकरानं कोरोना संक्रमण पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्वसामान्याना लोकलनं प्रवास करण्यास बंदी घातली होती.  १ फेब्रुवारी पासून सर्वसामान्य लोकांना वेळा निश्चित करून रेल्वे(Railway) प्रवासाची मुभा देण्यात आली.

जवळपास ११ महिन्यानंतर सर्वसामान्यांसाठी रेल्वेप्रवास सुरू करण्यात आला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रानी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की,  'भारताचा आत्मा, मी प्रार्थना करतो की आपण हे कधीही गमावणार नाही.'  आतापर्यंत या फोटोला  ८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ३६८ पेक्षा जास्त ट्विट्स या फोटोला मिळाले आहेत. खाकीला सलाम! महिला पोलिसानं दिला बेवासराला मृतदेहाला खांदा अन् २ किमी केली पायपीट

सोशल मीडिया युजर @Madan_Chikna यांनी कमेंट केली आहे की, मनाला स्पर्श करणारा हा फोटो आहे. एक प्रवाशी लोकलमध्ये चढण्याआधी ट्रेनचा नमस्कार करत आहे. कारण तब्बल ११ महिन्यांनी मुंबईचा लाईफलाईन असणारी ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. वाह! वयस्कर जोडप्यानं धरला असा ठेका; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात.....

Web Title: Anand mahindra shared heart touching photo of mumbai local commuter worshipping train before boarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.