लॉकडाऊनमुळे पठ्ठ्यानं झाडाला साखळीनं बांधली स्कॉर्पिओ; अन् आनंद महिंद्रा म्हणाले,....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 07:09 PM2020-11-06T19:09:17+5:302020-11-06T19:10:25+5:30
Viral News in marathi : सोशल मीडियावर या कारचा फोटो व्हायरल झाला असून लोक वेगवेगळ्या कमेंट्स या फोटोवर करत आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून नेहमीच लोकांपर्यंत संदेश पोहोचवत असतात. आज आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एका स्कोर्पिओ कारचा फोटो शेअर केला. तुम्ही पाहू शकता एक साखळीच्या साहाय्याने स्कॉर्पिओ झाडाला बांधली आहे. सोशल मीडियावर या कारचा फोटो व्हायरल झाला असून लोक वेगवेगळ्या कमेंट्स या फोटोवर करत आहेत.
Not exactly a high tech locking solution but at least it shows the owner’s possessiveness! To me, this pic perfectly describes how I feel under lockdown. This weekend I’m going to try breaking that chain..(with my mask on!) pic.twitter.com/CbW4FUml1a
— anand mahindra (@anandmahindra) November 6, 2020
महिंद्रा यांनी कारचा फोटो करत कॅप्शन दिलं आहे की, ही जरी हाय टेक लॉकिंग सिस्टीम नसली तरी मालकाचे आपल्या गाडीशी असलेलं बॉडिंग यातून दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये कार चालकाला काय वाटत असेल हे या फोटोच्या माध्यमातून दिसून येत आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोला ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
कारप्रेमी पठ्ठ्यानं घरावर बांधली स्कॉर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी
बिहारमधील एका व्यक्तीने चक्क त्याच्या स्कॉर्पिओ गाडीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी घराच्या गच्चीवर गाडीची प्रतिकृती उभी केली आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील इंतसर आलम यांनी आपल्या आयुष्यात स्कॉर्पिओ ही गाडी पहिल्यांदा खरेदी केली होती. त्यामुळे या गाडीच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या चार मजली घरावर स्कॉर्पिओ गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी उभी केली आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गच्चीवर या गाडीचे सेम मॉडेल तयार केले गेले असून सेम क्रमांकाची नंबर प्लेट देखील लावण्यात आली आहे. गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. या स्कॉर्पिओच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना या माणसाच्या पत्नीची होती. उत्तर प्रदेशच्या आग्राच्या ट्रीपवेळी तिच्या डोक्यात ही कल्पना आली होती. मग या टाकीच्या आकाराचा विचार करत असताना डोक्यात स्कॉर्पिओ गाडीच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना आली होती. त्यानंतर यासाठी आग्र्यावरून कामगार आणत हे काम सुरु केले. या संपूर्ण कामासाठी त्याला अडीच लाख रुपये खर्च आल्याचे त्याने सांगितले होते.
@MahindraRise Scorpio converted to a water tank in Bihar. pic.twitter.com/C9CH3ddLGW
— Ishwar Jha (@IshwarJha) October 25, 2020
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या पाण्याच्या टाकीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत कमेंट केली होती. स्कॉर्पिओ ही महिंद्रा ग्रुपची निर्मिती आहे आणि त्याचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना ही कल्पना आवडली. ट्विटरवरील पोस्टमध्ये आनंद व्यक्त करत आनंद महिंद्रा म्हणाले होते. जबरदस्त! भारतातील दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ कॅमेरात कैद; पाहा व्हायरल फोटो की, "आता यालाच मी एक राइज स्टोरी म्हणतो. स्कॉर्पिओ राइजिंग टू द रूफटॉप. त्यांच्या पहिल्या कार प्रेमाला माझा सलाम.'' संपूर्ण बिहारमध्ये या गाडीविषयी क्रेझ आहे. या भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे आणि सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना स्कॉर्पिओसारख्या मजबूत आणि टिकाऊ गाड्यांची गरज भासते. बिहारमधील अनेक राजकीय नेत्यांकडेदेखील स्कॉर्पिओ असतात. बाबो! दिवाळीला फटाके बॅन झाले म्हणून 'असा' केला जुगाड; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल