डिशवर बसलेल्या माकडाला पाहून महिंद्रांनी दिली 'ही' रिएक्शन, जाहीर केले 'कॅप्शन कॉन्टेस्ट'च्या विजेत्यांचे नाव
By manali.bagul | Published: October 13, 2020 03:40 PM2020-10-13T15:40:45+5:302020-10-13T15:46:15+5:30
Viral News of Monkey in Marathi: सोमवारी विजेत्यांचे नाव घोषित करत त्यांचे अभिनंदन केले. गमतीदार कॅप्शनसाठी त्यांनी @ vallisurya1आणि @TheSameWall या युजर्सची निवड केली आहे. '
उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियाावर नेहमीच गमतीदार व्हिडीओज किंवा फोटोज शेअर करत असतात. शनिवारी ट्विटरवर आनंद महिंद्रांनी एक कॅप्शन कॉन्टेस्ट (Caption Contest) पोस्ट केले होते. आता स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावांची घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली आहे. सध्या आनंद महिंद्रा यांचे ट्विटरवर ८.२ मिलियन्स फॉलोअर्स असून त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट तुफान व्हायरल होतात. अलिकडेच त्यांनी शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन द्या. असं आवाहन त्यांनी सोशल मीडिया युजर्सना केलं होतं.
Announcing the winners of my most recent caption contest. Interestingly, they were also amongst the quickest to respond, even though it wasn’t a ‘fastest fingers first’ contest! Congratulations @vallisurya1@TheSameWall Please DM @MahindraRise to receive your scale model trucks! pic.twitter.com/0L5QIMRuIb
— anand mahindra (@anandmahindra) October 12, 2020
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक माकड छतावरील डीश एंटीनावर येऊन निवांत बसला आहे. तसंच तोंड उघडं ठेवून आश्चर्यचकित झाल्याप्रमाणे पाहत आहे. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होत असून जवळपास ८८ हजार लोकांनी या फोटोवर रिएक्शन दिल्या आहेत. या स्पर्धेच्या नियमांनुसार या फोटोला गमतीदार कॅप्शन द्यायचे होते. अधिकाधिक स्पर्धकांमधून महिंद्रा यांनी दोन विजेत्यांची निवड केली आहे. त्यांनी एक हिंदी आणि एक इंग्लिश कॅप्शन निवडलं आहे. बाबो! समुद्रकिनारी सापडला तब्बल १०० किलोंचा दुर्मिळ कासव, अन् मग...., पाहा फोटो
त्यांनी सोमवारी विजेत्यांचे नाव घोषित करत त्यांचे अभिनंदन केले. गमतीदार कॅप्शनसाठी त्यांनी @ vallisurya1आणि @TheSameWall या युजर्सची निवड केली आहे. 'एक बंदर, टीवी के अंदर.' असं कॅप्शन हिंदी कॅप्शन विजेत्यानं दिलं असून DTH- डायरेक्ट टू हनुमान.' असं इंग्लिश कॅप्शन विजेत्याने दिलं आहे. या माकडाचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. नेटिझन्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आनंद महिंद्रांनी काही कमेंट्स रिट्विट केल्या आहेत. सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा 'देवमाणूस'...