Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केली 'अंतिम' इच्छा; एकदम छोटी आहे, मग का आहे एवढी खास...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 04:23 PM2022-02-09T16:23:14+5:302022-02-09T16:23:41+5:30

उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अनेकदा रंजक माहिती शेअर करत असतात. कधी ट्रोल होतात, तर अनेकदा फेमसही होतात. आज आनंद महिंद्रांनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली आहे. बस एक कप चाय आणि सेल्फी. तुम्ही म्हणाल हे तर ते केव्हाही करू शकतात.

Anand Mahindra shares Wish a cup of tea at Hindustan ki Antim Dukan and selfie | Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केली 'अंतिम' इच्छा; एकदम छोटी आहे, मग का आहे एवढी खास...

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी शेअर केली 'अंतिम' इच्छा; एकदम छोटी आहे, मग का आहे एवढी खास...

Next

उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अनेकदा रंजक माहिती शेअर करत असतात. कधी ट्रोल होतात, तर अनेकदा फेमसही होतात. कधी कधी ते एखाद्या गरीब परंतू होतकरू लोकांचे एकसो एक जुगाड शेअर करतात, तर कधी साहस केल्याची स्तुती. परंतू आज आनंद महिंद्रांनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली आहे. बस एक कप चाय आणि सेल्फी. तुम्ही म्हणाल हे तर ते केव्हाही करू शकतात. परंतू, हा सेल्फी खास आहे, म्हणजेच याचे ठिकाण खास आहे. 

आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी भारताच्या शेवटच्या दुकानाचा फोटो रिट्विट केला आहे. तसेच हा देशातील सर्वात सुंदर सेल्फी स्पॉटपेक्षा कमी नाहीय, असे म्हटले आहे. या दुकानाचे नाव 'हिंदुस्तान की अंतिम दुकान' असे आहे. त्याचीही त्यांनी स्तुती केली आहे. तसेच या दुकानात एक कप चहा पिने खूप मौल्यवान असेल असेही त्यांनी म्हटले आहे. 

हे दुकान उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. चीनची सीमा अगदी जवळ आहे. माणा गाव हे चीनच्या सीमेवर वसलेले आहे. या गावातील हे चहाचे दुकान आहे. चंदेर सिंह बड़वाल (Chander Singh Badwal) यांचे हे दुकान आहे. २५ वर्षांपूर्वी त्यांनी हे दुकान सुरु केले होते. पर्यटकांमध्ये हे दुकान प्रचंड लोकप्रिय आहे. येथे येणारा प्रत्येक व्यक्ती येथील चहा आणि मॅगी खूप पसंद करतो. 

माना गावाचे जुने नाव मणिभद्रपुरम असल्याचे पर्यटक सांगतात. स्थानिक लोक याचा संबंध महाभारताच्या कथेशी जोडतात. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर लोकांनी त्याच्याशी संबंधित किस्से सांगायला सुरुवात केली. या मार्गाने पांडव स्वर्गात गेले असे म्हणतात. माना हे या सीमेवरील शेवटचे भारतीय गाव असल्याचेही गावाजवळील मुख्य रस्त्यावरील फलकावर लिहिलेले आहे.

Web Title: Anand Mahindra shares Wish a cup of tea at Hindustan ki Antim Dukan and selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.