Anand Mahindra Tag Nitin Gadkari: आपल्याकडे हे करून दाखवा! गडकरी आनंद महिद्रांचे आव्हान स्वीकारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:32 AM2022-03-04T11:32:02+5:302022-03-04T11:32:22+5:30

Anand Mahindra Tag Nitin Gadkari on one idea: महिंद्रा यांनी यावेळी दक्षिण कोरियाचा (South Korea) एक व्हिडीओ शेअर केला आहे. तेथील रस्ता आपल्या एक्सप्रेस वे पेक्षाही मोठा आहे.

Anand Mahindra Tag Nitin Gadkari on one idea: South Korea, the solar panels in the middle of the highway have a bicycle path underneath | Anand Mahindra Tag Nitin Gadkari: आपल्याकडे हे करून दाखवा! गडकरी आनंद महिद्रांचे आव्हान स्वीकारणार?

Anand Mahindra Tag Nitin Gadkari: आपल्याकडे हे करून दाखवा! गडकरी आनंद महिद्रांचे आव्हान स्वीकारणार?

Next

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची समृद्धी महामार्गावरून स्तुती केली होती. दोन भागांना जोडण्यासाठी व प्राण्यांना ये जा करण्यासाठी फ्लायओव्हर बांधण्यात आला आहे. आता महिंद्रा यांनी आणखी एक व्हिडीओ ट्विट करत असे आपल्याकडे होऊ शकते. निदान पर्यावरणपूरक एनर्जी तयार होईल असे म्हटले आहे. 

महिंद्रा यांनी यावेळी दक्षिण कोरियाचा (South Korea) एक व्हिडीओ शेअर केला आहे. तेथील रस्ता आपल्या एक्सप्रेस वे पेक्षाही मोठा आहे. या रस्त्यावर मधोमध सायकल स्वारांसाठी मार्ग ठेवण्यात आलेला आहे. तो खूप वेगळा आहे. त्यावर सावली म्हणून सोलार पॅनल लावण्यात आलेले आहेत. यामुळे सायकलस्वारांना सावली ही मिळते आणि सुरक्षित मार्ग. याचबरोबर हरित एनर्जी देखील मिळते. 

आनंद महिंद्रा यांनी गडकरींना या पोस्टमध्ये टॅग केले आहे. काय आयडिया आहे असे ते म्हणाले आहेत. असेच काम आपण नाले, गटारी झाकण्यासाठी करतो. मात्र, हे पाहण्यासारखे आहे. सायकल चालविणारे आपल्याकडे एक्स्प्रेस वेचा वापर करणार नाहीत, पण कोण जाणे, या प्रकारे उपाय केल्यास सायकल चालविण्यातही वाढ होईल आणि स्वच्छ वीजदेखील मिळेल. 

आता गडकरी यावर काय उत्तर देतात, हे आव्हान स्वीकारतात का हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. सध्याच्या एक्स्प्रेस वेला शक्य नाही. परंतू छोट्या छोट्या शहरांना जोडणाऱ्या भविष्यातील मार्गांवर हे शक्य होऊ शकते. कारण त्यासाठी तशी डिझाईन आणि वापर होईल का याचाही विचार करावा लागणार आहे. मुंबई, पुण्यात नोकरीला असलेले अनेक तरुण सध्या सायकली घेवून विकेंडला बाहेर पडतात. ते मुंबई पुणे कोल्हापूर जुना हायवे, किंवा आतील रस्त्यांवर सायकल चालवून व्यायम करतात किंवा आनंद लुटतात. पण ते रिस्की असते. कारण भरमसाठ वेगात वाहनेही ये जा करत असतात. त्यांच्यासाठी असे रस्ते झाल्यास दुहेरी फायदा होणार आहे. 

Web Title: Anand Mahindra Tag Nitin Gadkari on one idea: South Korea, the solar panels in the middle of the highway have a bicycle path underneath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.