Anand Mahindra Video : इडली बनवण्याची नवीन पद्धत Anand Mahindra यांनी शेअर केला व्हिडिओ; एकदा पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 06:10 PM2023-04-03T18:10:13+5:302023-04-03T18:11:18+5:30
Anand Mahindra Shares Video: आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते सतत काही ना काही नवीन कंटेट पोस्ट करत राहतात.
Anand Mahindra New Post: महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. ते सतत त्यांच्या फॉलोअर्ससाठी काही ना काही नवीन आणि मजेशीर कंटेट पोस्ट करत राहतात. त्यांच्या पोस्ट मजेशीर असण्यासोबतच काहीतरी नवीन शिकवूनही जातात. आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओ पाहा:-
On the one hand you have ‘Idli-Amma’ who makes her Idlis laboriously & slowly. On the other, you have some tools of mass-manufacturing used to make Idlis at scale! But don’t miss the human touch that will ALWAYS be Indian: the short break taken to share some ‘idli-love’ with the… pic.twitter.com/uUu4Uj63PM
— anand mahindra (@anandmahindra) April 1, 2023
आनंद महिंद्रा यांनी यावेळी इडली बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ अतिशय वेगळा आहे. महिंद्रांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर इडली बनवताना दिसत आहे. आधी तो इडलीसाठी पीठ तयार करतो आणि नंतर इडलीच्या साच्यात ओततो. काही वेळातच एका मोठ्या ओव्हनमध्ये या इडल्या तयार होतात. व्हिडिओच्या शेवटी इडली तयार करणारी व्यक्ती एका गायीलाही इडली खाऊ घालताना दिसत आहे.
आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओला कॅप्शन देत म्हटले की, 'एकीकडे इडली अम्मा आहेत, ज्या मेहनतीने प्रत्येक इडली हळूवारपणे तयार करतात आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर इडली तयार करण्यासाठी विविध साधने आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी स्पर्श. पूर्णपणे भारतीय. येथेही कामावरुन विश्रांती घेऊन गाईला प्रेमाचे इडली खाऊ घातली जाते.' हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी विविध कमेंटही केल्या आहेत.