3D प्रिंटरने बनवली आगळी-वेगळी जिलेबी; आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा video...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 06:07 PM2024-02-21T18:07:36+5:302024-02-21T18:08:37+5:30
Anand Mahindra Viral Post : आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Anand Mahindra Viral Post : लोकप्रिय भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असतात. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर (आता X) नेहमी प्रेरणा देणाऱ्या किंवा मनोरंजक पोस्ट टाकत राहतात. सोशल मीडियावर त्यांची फॉलोइंग मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या सर्वच पोस्ट प्रचंड व्हायरल होतात. आता त्यांनी असाच एक आगळा-वेगळा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हीही चकीत व्हाल.
तुम्ही अनेकदा जलेबी बनवताना पाहिली असेल, पण ही जिलेबी थ्रीडी प्रिंटरने बनवताना पाहिली आहे का? आनंद महिंद्रा यांनी हाच व्हिडिओ पोस्ट केला आहे. 40 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मिठाईवाला चक्क थ्रीडी प्रिंटरने जलेबी बनवताना दिसतोय. थ्रीडी प्रिंटरच्या नोझलद्वारे गरम तेलाच्या पॅनमध्ये जिलेबी टाकल्या जात आहेत.
I’m a tech buff.
— anand mahindra (@anandmahindra) February 21, 2024
But I confess that seeing jalebis being made using a 3D printer nozzle left me with mixed feelings.
They’re my favourite & seeing the batter squeezed out by hand is, to me, an art form.
I guess I’m more old-fashioned than I thought…pic.twitter.com/RYDwVdGc3P
थ्रीडी प्रिंटरने बनवलेल्या जिलेबीचा आकारही सामान्य जिलेबीपेक्षआ थोडा वेगळा दिसतोय. विशेष म्हणजे, ही जिलेबी घेण्यासाठी दुकानात गर्दीही पाहायला मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकरी विविध कमेंट्सही करत आहेत.