Anand Mahindra Viral Tweet: तुम्ही NRI आहात का? आनंद महिंद्रांना विचारला प्रश्न; महिंद्रांनी दिले जबरदस्त उत्तर...
By ओमकार संकपाळ | Published: July 7, 2022 06:04 PM2022-07-07T18:04:36+5:302022-07-07T18:04:45+5:30
Anand Mahindra Viral Tweet: आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोवर एका युझरने कमेंट केली, त्यावर आनंद महिंद्रांनी दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली.
Anand Mahindra Viral Tweet: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांची जगभर ख्याती आहे. ते आपल्या दानशूरपणासाठी ओळखले जातात. यासोबतच, त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर दोन फोटो शेअर केले. ते फोटो पाहून एका युझरने महिंद्रा यांना त्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल प्रश्न विचारला. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी दिलेले उत्तर अनेकांची मने जिंकत आहे.
महिंद्रांनी मॅनहॅटनचे फोटो शेअर केले...
Manhattan 4th of July Skyline. (1/3) pic.twitter.com/USnmmULw4a
— anand mahindra (@anandmahindra) July 5, 2022
हे ट्विट आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी शेअर केले. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले की, 4 जुलै रोजी मॅनहॅटनचे आकाश. हे फोटो 4 जुलै रोजी अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमातील आहेत. त्यांनी व्हिडिओदेखील शेअर केला, ज्यामध्ये मॅनहॅटनच्या आकाशातील फटाक्यांचे अप्रतिम दृष्य दिसत आहे.
तुम्ही NRI आहात का?
Are you an NRI?
— Umesh Human (@UmeshHuman) July 5, 2022
आनंद महिंद्रा 4 जुलै रोजी अमेरिकेत होते, याचा अंदाज या पोस्टवरून लावता येतो. हा दिवस 'युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिके'चा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. महिंद्राची ही पोस्ट पाहिल्यावर शेकडो युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. परंतु यापैकी एकाने महिंद्रांना विचारले की, तुम्ही अनिवासी भारतीय (NRI) आहात का? NRI म्हणजे भारताबाहेर राहणारी, भारतीय व्यक्ती.
आनंद महिंद्राच्या उत्तराने मन जिंकले
Just visiting family in New York. So am an HRI. Heart (always) resident in India….😊 https://t.co/ydzwTux9vr
— anand mahindra (@anandmahindra) July 5, 2022
आनंद महिंद्रा यांनी यूजर्सच्या प्रश्नांला अप्रतिम उत्तर दिले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले - 'नुकतेच कुटुंबाला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला आलो, त्यामुळे मी एचआरआय आहे. हृदयातून (नेहमी) भारतात राहणारा.(HRI- Heart (always) residing in India.)' त्यांच्या या उत्तराने युजर्सची मने जिंकली.