...अन् सापाला उचलायला गेला चिमुरडा; viral video पाहून तुमच्याही काळजाचा चुकेल ठोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 04:51 PM2020-06-10T16:51:30+5:302020-06-10T16:52:17+5:30
सेल्फी आणि व्हिडीओचा मोह लेकाराच्या जीवावरही बेतू शकतो.
कोरोना व्हायरसमुळे गेली दोन-अडीच महिने लॉकडाऊन होता. आता हळुहळू तो उठवला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपापल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमुळे अनेकांना कुटुबीयांना आपापल्या लेकरांना भरपूर वेळ देता येत आहे. त्यामुळेच गावाला गेलेली अनेक जणं आपल्या लेकरांसह शेतात फेरफटका मारताना दिसत आहे. सेल्फी, व्हिडीओ शुटींग करत आहेत. पण, योग्य ती काळजी न घेतल्यास सेल्फी आणि व्हिडीओचा मोह लेकाराच्या जीवावरही बेतू शकतो. याची जाणीव करून देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Video : पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी 'मोरा'नं धरला ताल; पांढऱ्या मोराचा डान्स व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक तीन-चार वर्षांचा चिमुरडा शेतात चालत आहे. त्याचे वडील त्याचं चालणं मोबाईलमध्ये शूट करत आहेत. पण, अचानक हा चिमुरडा एका गोष्टीकडे आकर्षित होतो आणि थांबतो. सोनेरी रंगाची रसी असलेली ती वस्तू साप आहे, हे त्या चिमुरड्याला कुठे माहीत? तो त्या सापाला उचलायला जाणार तितक्यात साप त्याचा फणा काढतो... पुढे काय होतं ते तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळेल. पण, हा प्रसंग आपल्या काळजाचा ठोका नक्की चुकवेल.
दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलतंंय; खासदार गौतम गंभीरचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'
पाहा व्हिडीओ...
"व्हाॅट्सअपलाच आलयं पण महत्वाचं आहे,
— SANDESH BHAGWAT (@S4NDY07) June 10, 2020
कृपया फोटो काढताना, व्हिडिओ बनवताना भान ठेवा...🙏🥵😰#मराठी#जनहितार्थpic.twitter.com/B3XCFaPVSk
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत!
पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!
शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही
बाबो; ऐतिहासिक विजयाच्या आनंदात 'तिनं' केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर धुमाकूळ
चिनी वस्तूंसह हिच्यावरही बहिष्कार घाला; ट्विटमध्ये आपला फोटो पाहून ज्वाला गुट्टा खवळली
अरे देवा: विम्बल्डन विजेता 73 व्या वर्षी चढला बोहोल्यावर; 30 वर्षांनी लहान आहे पाचवी पत्नी!