अँड ऑस्कर गोज टु....! हरणाने चित्ता अन् तरस दोघांनाही मस्त 'मामू' बनवले, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 02:31 PM2021-07-26T14:31:11+5:302021-07-26T14:34:07+5:30
युक्तीचा उपयोग करून बलाढ्य शत्रुला एखादा लहानसा जीव सहज हरवू शकतो. तुम्हाला या वाक्यावर विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहाच. यात हरणाने अशी काही शक्कल लढवलीये की ते पाहुन तुम्ही तोंडात बोटे तर घालालच पण हरिणाच्या बुद्धीचेआणि अभिनयाचे कौतुकही कराल...
शक्तीपेक्षा युक्ती महान ही म्हण आपण सर्वांनीच एकली असेल. युक्तीचा उपयोग करून बलाढ्य शत्रुला एखादा लहानसा जीव सहज हरवू शकतो. तुम्हाला या वाक्यावर विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहाच. यात हरणाने अशी काही शक्कल लढवलीये की ते पाहुन तुम्ही तोंडात बोटे तर घालालच पण हरिणाच्या बुद्धीचेआणि अभिनयाचे कौतुकही कराल...
And The Oscar goes to.....🤣 pic.twitter.com/Iwk3yrEN4E
— The Dark Side Of Nature (@darksidenatures) July 25, 2021
या व्हिडिओत एका हरणाला एक चित्ता खाण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात तिथे तरस येते. तरस त्या चित्त्याला हुसकावून लावते. मग स्वत: त्या हरणाजवळ जाते आणि त्याचे पोट फाडु लागते. इतक्यात चित्ता पुन्हा हरणाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. त्याला हुसकावण्यासाठी तरस पुन्हा चित्त्याकडे धाव घेते.नेमकी हिच संधी साधून हरण गपचूप उठते आणि पळ काढते. काही क्षणात हरण झाडाझुडपांसमध्ये पसार होते आणि तरसाच्या तोंडाला पाने पुसते.
the cheetah pic.twitter.com/O9kp6EsNXt
— Ras Sherrif 🐐 (@RasSherrif) July 25, 2021
Ha ha that's hilarious 😂 😂
— Vinay (@camvinay) July 26, 2021
Survival skills 😜😜😜
— Sanjay Patil संजय पाटील 🇮🇳 (@sanjaybpatil) July 26, 2021
हा व्हिडिओ जुना जरी असला तरी आता पुन्हा व्हायरल होत आहे. द डार्क साईड ऑफ नेचर या अकाऊंटने ट्वीटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला त्यांनी अतिशय समर्पक अशी कॅप्शन दिलीय. त्यात लिहिलंय, ऑस्कर गोज टू....नेटकरी हा व्हिडिओ वारंवार बघत आहेत. हरणाच्या हुशारीची दाद देत आहेत. अनेकांनी हरणाच्या अभिनयाचे भारी कौतुक केलेय.
३२ सेकंदाची हि क्लिप पोस्ट केल्या केल्या काही क्षणांत व्हायरल झालीय. याला आतापर्यंत ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज आणि १५ हजार लाईक्स मिळाले आहेत.