Vegetable seller to municipality chief : याला म्हणतात नशीब! कालपर्यंत रस्त्यावर भाजी विकत होता; अन् आज बनला पालिकेचा अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 01:06 PM2021-03-19T13:06:41+5:302021-03-19T13:08:49+5:30
Trending Viral News in Marathi : फैयाज बाशा नावाच्या माणसाला भाजीवाल्यापासन नगर पालिकेचा अध्यक्ष बनण्यासाठी फक्त काही आठवढे लागले आहेत.
भगवान देता है तो छप्पर फाड के! हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. असाच काहीसा प्रकार एका भाजीवाल्यासोबत घडला आहे. फैयाज बाशा नावाच्या माणसाला भाजीवाल्यापासन नगर पालिकेचा अध्यक्ष बनण्यासाठी फक्त काही आठवढे लागले आहेत. बाशा एक पदवीधारक असून चांगली नोकरी न मिळाल्यानं पैसे मिळवण्यासाठी त्यानं भाजी विकण्याचं ठरवलं. पण जेव्हाही त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते वाईएसआरसीपी या राजकिय पक्षाचे काम करायचे. आपली मेहनत आणि कष्टाच्या जोरावर ते भाजीवाल्यापासून एक नगर पालिकेचे अध्यक्ष बनले आहेत.
चांगल्या बहूमतानं जिंकले निवडणूक
बाशा यांनी रायचोटी नगर पालिकेच्या मागच्या निवडणूकांसाठी पक्षाच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता आणि व्हायआरसीच्या उमेदवाराला जिंकवण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. म्हणूनच पक्षानं बाशा यांना निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. लोकांनी बाशा यांना बहूमतानं निवडून देऊन पक्षाचा निर्णय योग्य ठरल्याचं दाखवून दिलं आहे. चांगल्या बहूमतानं जिंकून बाशांनी स्वतःचं नाव कमावलं आहे. निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
या दमदार विजयानंतर बाशा म्हणाले की, ''मी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना धन्यवाद देतो. कारण त्यांनी माझ्यासारख्या भाजीविक्रेत्याला पालिकेचा अध्यक्ष बनण्यास पात्र समजले. पदवी असूनही चांगली नोकरी नसल्यानं बेरोजगारीमुळे मला जीवन जगण्यासाठी भाज्या विकाव्या लागत होत्या. पण आता मला माझी दिशा सापडली असून मी योग्य दिशेने वाटचाल करेन.'' बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....)