वरमाला घालताना नवरीला आला राग, दिला असा लुक की नवरदेवाचे झाले 'हे' हाल, नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 11:41 AM2021-09-03T11:41:01+5:302021-09-03T11:45:43+5:30
सध्या इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. ही नवरी लग्नाच्या स्टेजवरच भडकलेली दिसत (Angry Bride) आहे. ती का भडकलीय याचं कारणं मात्र व्हिडिओतच लपलेलं आहे...
समजा तुम्ही लग्नासाठी उभे आहात आणि तुमच्या मित्रांनी अख्ख्या लग्नात घोळ घातला तर तुमची काय हालत होईल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या होणाऱ्या पत्नीला याचं काय वाटेल याचा विचार करुनही तुम्हाला टेन्शन येईल. सध्या इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. ही नवरी लग्नाच्या स्टेजवरच भडकलेली दिसत (Angry Bride) आहे. ती का भडकलीय याचं कारणं मात्र व्हिडिओतच लपलेलं आहे...
हा लग्नातील व्हिडिओ निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यात नवरी आणि नवरदेव वरमामाला घालण्याच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर उभा राहिल्याचं दिसतं. इतक्यात नवरदेवाचे मित्र दोघांची मस्करी करायला सुरुवात करतात. हे पाहून नवरी रागवते आणि तिथूनच नवरदेवाच्या मित्रांकडे रागात बघते. नवरीचा लूक पाहूनच समजतं की ती किती रागात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ६२ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यात नवरी रागात असली तरीही व्हिडिओ अतिशय विनोदी आहे. नेटकऱ्यांनीही यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.