VIDEO : लग्नाचा रिवाज पार पाडता पाडता संतापली नवरी, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलं तिचं लग्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 12:40 PM2021-08-19T12:40:13+5:302021-08-19T12:41:51+5:30

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघायला मिळत आहे की, असाच एक रिवाज पार पाडत असताना नवरी चांगलीच संतापली.

Angry bride video goes viral in wedding video watch people reaction | VIDEO : लग्नाचा रिवाज पार पाडता पाडता संतापली नवरी, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलं तिचं लग्न...

VIDEO : लग्नाचा रिवाज पार पाडता पाडता संतापली नवरी, लोक म्हणाले - जबरदस्ती लावलं तिचं लग्न...

Next

आजकाल सोशल मीडियावरलग्नाचे अनेक व्हिडीओ ट्रेन्ड होताना दिसतात. ज्यातील काही व्हिडीओ लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात तर काही व्हिडीओ लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित करतात. इन्स्टाग्रामवर एका संतापलेल्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात प्रश्न पडत आहेत. व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. 

भारतीय लग्नांमध्ये दररोज वेगवेगळे रिवाज पार पाडले जातात. ते पार पाडत असताना थकवा येणे स्वाभाविक आहे. अनेकदा तर नवरी-नवरदेवांना खाण्या-पिण्यासाठीही वेळ मिळत नाही. आराम तर दूरच राहिला. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघायला मिळत आहे की, असाच एक रिवाज पार पाडत असताना नवरी चांगलीच संतापली. (हे पण बघा : मैने होठोंसे लगाई तो...! नशेत टल्ली होऊन नाचली महिला, पुढे जे झालं ते पाहून म्हणाला - हिला आवरा!)

नवरीची पाठवणी करत असताना तांदूळ आणि काही पदार्थ माहेरच्या उंबरठ्यावर पाठ करून फेकत असते. असं मानलं जातं की, याने मुलगी सार झाल्यावर घरात समृद्धी राहते. या नवरीने रिवाजाची सुरूवात तर ठीक केली. पण नंतर ती अशी काही संतापली की, सगळेण बघतच राहिले. 

नवरीचं हे अचानक असं वागणं पाहून आजूबाजूच्या महिला हैराण झाल्या. त्यांनाही प्रश्न पडला की ही अचानक असं का वागतेय. या व्हिडीओवरून लोक चांगलीच खिल्ली उडवत आहे. अनेकांनी कमेंट केल्या की, तिचं लग्न जबरदस्ती लावून दिलं असेल. तर काही लोक गमतीने म्हणाले की, नवरीच्या अंगात देवी आली.
 

Web Title: Angry bride video goes viral in wedding video watch people reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.