मैदान सोडून प्रेक्षकांच्या गर्दीत उडी घेतली बैलाने, हा थरार पाहुन तुमच्या अंगावर येईल काटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 03:29 PM2021-08-08T15:29:26+5:302021-08-08T15:30:47+5:30

काही व्हिडिओ असेही असतात जे पाहूनच अंगावर काटा येतो. विचार करा की कधी तुम्ही बैलाचा (Bull Video) खेळ पाहण्यासाठी गेला आहात आणि अचानक बैल तुमच्यावर धावून आलाय. सहाजिकच कोणाचीही घाबरगुंडी उडेल. अशीच एक घटना अमेरिकेच्या (America) इडाहो येथे घडली.

the angry bull jumped into the audience, video goes viral | मैदान सोडून प्रेक्षकांच्या गर्दीत उडी घेतली बैलाने, हा थरार पाहुन तुमच्या अंगावर येईल काटा!

मैदान सोडून प्रेक्षकांच्या गर्दीत उडी घेतली बैलाने, हा थरार पाहुन तुमच्या अंगावर येईल काटा!

googlenewsNext

सोशल मीडियावर (Social Media) दररोज निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हसवणारे तर काही रडवणारे असतात, मात्र या पलीकडे जाऊन काही व्हिडिओ असेही असतात जे पाहूनच अंगावर काटा येतो. विचार करा की कधी तुम्ही बैलाचा (Bull Video) खेळ पाहण्यासाठी गेला आहात आणि अचानक बैल तुमच्यावर धावून आलाय. सहाजिकच कोणाचीही घाबरगुंडी उडेल. अशीच एक घटना अमेरिकेच्या (America) इडाहो येथे घडली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता मैदानावर बैलांचा एक खेळ सुरु आहे. सुरुवातीला बैल इकडून तिकडे पळतो. तेव्हा काही वाटत नाही. पण अचानक हा बैल बिथरतो. कॉमेंटर कॉमेंट्री करत असतो की हा बैल खुप रागवलेला आहे. तितक्यात हा बैल मैदानात बसलेल्या प्रेक्षकांकडे धाव घेतो व कुंपण म्हणून बांधलेल्या दोरीवरून उडी मारून प्रेक्षक जिथे बसलेले असतात तिथे उडी मारतो. त्यानंतर कॅमेरा वाकडा तिकडा फिरत असल्याने पुढे काय होते ते आपल्याला समजत नाही. मात्र प्रेक्षकांमधून येणारा जोरदार ओरडण्याचा आणि गोंधळाचा आवाज आपण ऐकू शकतो. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ viral hog नावाच्या चॅनेलवरून शेअर केला गेला आहे. लोक या व्हिडिओवर विविध कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

Web Title: the angry bull jumped into the audience, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.