जंगल सफारी करत असलेल्या पर्यटकांच्या कार मागे धावला जिराफ, लोकांची हालत खराब!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 02:36 PM2024-05-28T14:36:37+5:302024-05-28T14:37:57+5:30
Viral Video : एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात शांत वाटणारा जिराफ हा उंच प्राणी पर्यटकांच्या एका गाडीमागे लागलेला दिसत आहे आणि पर्यटक घाबरलेले आहेत.
Viral Video : बरेच लोक निसर्गाच्या सानिध्यात राहता यावं आणि वेगवेगळे प्राणी बघता यावे म्हणून जंगल सफारीला जात असतात. जास्तीत जास्त लोक आपल्या परिवारासोबत जंगल सफारीचा आनंद घेतात. यादरम्यान त्यांना वाघ, बिबटे, हत्ती, हरीण सोबतच इतरही खतरनाक प्राणी प्रत्यक्ष बघायला मिळतात. हे प्राणी शिकार कसे करतात याचाही नजारा बघायला मिळतो. जंगल सफारीवेळी गार्डही लोकांसोबत राहतात. तुम्ही काही व्हिडीओ पाहिले असतील ज्यात कधी गेंडा तर कधी वाघ पर्याटकांच्या गाडीमागे लागलेले दाखवतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात शांत वाटणारा जिराफ उंच प्राणी पर्यटकांच्या एका गाडीमागे लागलेला दिसत आहे आणि पर्यटक घाबरलेले आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, काही पर्यटक जंगल सफारीसाठी गाडीतून फिरत आहेत. पण तेव्हाच एक जिराफ लोकांना बघून भडकतो आणि पर्यटकांच्या गाडीमध्ये धावू लागतो. गाडीमागे जिराफ किती वेगाने धावत येत आहे हे बघता येतं. दरम्यान पर्यटक चांगलेच घाबरलेले आहेत. नंतर काही वेळाने जिराफ आपोआप शांत होतो आणि त्यांचा पाठलाग करणं सोडतो. तेव्हा लोकही शांत झालेले दिसतात.
Giraffe chasing jeep straight outta Jurassic Park pic.twitter.com/YXEjBpgNXN
— Crazy Clips (@crazyclipsonly) May 21, 2024
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @crazyclipsonly नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'जिराफ थेट जुरासिक पार्कमधून बाहेर येऊन जीपचा पाठलाग करत आहे'. केवळ 35 सेकंदाचा हा व्हिडीओ 2.3 मिलियन लोकांनी पाहिला. तर 7 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'हा एखाद्या सिनेमातील सीन वाटत आहे'. दुसऱ्याने लिहिलं की, 'यात लोकांचा जीवही जाऊ शकतो, तरीही लोक व्हिडीओ काढण्यावर लक्ष देत आहेत'.