Video : संतापलेल्या गेंड्याने केला कारचा चेंदामेंदा, ड्रायव्हरने कसाबसा वाचवला जीव!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 01:20 PM2019-08-29T13:20:25+5:302019-08-29T13:24:01+5:30
गेेंड्याचा इतका संतापलेला व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.
सोशल मीडियात तुम्ही अनेक प्राण्यांचे व्हिडीओ पाहिले असतील. किंवा पाण्यात शांतपणे बसून असलेल्या गेंड्यांचेही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण सध्या एका संतापलेल्या गेंड्याचा व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ जर्मनीतील होडेनहॅगनच्या सेरेन्गेट्टी सफारी पार्कमधील असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, धक्कादायक बाब म्हणजे या गाडीमध्ये ड्रायव्हर बसलेला होता, तो वेळीच गाडीतून बाहेर आला म्हणून त्याचा जीव वाचला.
'बिल्ड'ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडीओत दिसणारा भडकलेल्या गेंड्याचं वय ३० वर्षे आहे आणि त्याचं नाव कुसिनी आहे. त्याने अचानक जनावरांची काळजी घेणाऱ्या एका व्यक्तीवर हल्ला केला. अशातच तिथे असलेल्या इगोर पेट्रोने हा व्हिडीओ शूट केला.
गेंड्याला इतका जास्त राग आला होता की, त्याने कारचा चेंदामेंदा करून टाकला. सुदैवाने यातील ड्रायव्हर जीव वाचवण्यात यशस्वी ठरला. पण कारचं फार जास्त नुकसान झालं. ही घटना रविवारचं घडल्याचं समजतं.
रिपोर्टनुसार, पार्कचे मॅनेजर फॅब्रीजीओ सेप यांनी सांगितले की, आतापर्यंत गेंडा इतका का चिडला होता, याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. तो १८ महिन्यांपासून या पार्कमध्ये आहे. पण आतापर्यंत त्याने कुणालाही नुकसान पोहोचवलं नव्हतं.