आता बोला! १२ मास्क देऊनही एक डझन मास्क का दिले नाही म्हणून ग्राहकाने घातला 'धिंगाणा'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:18 PM2021-03-19T16:18:51+5:302021-03-19T16:22:44+5:30
एका ग्राहकाने १२ मास्क पाठवल्यावरही दुकानदारासोबत एक डझन मास्क का पाठवले नाही म्हणून वाद घातला. इतकेच काय तर दंडही मागितला.
सामान्यपणे ग्राहक हे त्यांचंच बरोबर मानतात आणि अनेकदा असे तर्क देतात की, ते गंमतीचा विषय बनून जातात. असंच काहीसं अमेरिकेतील मिन्नेसोडामध्ये झालं. येथील एका ग्राहकाने १२ मास्क पाठवल्यावरही दुकानदारासोबत एक डझन मास्क का पाठवले नाही म्हणून वाद घातला. इतकेच काय तर दंडही मागितला. चांगली बाब ही आहे की, ही चुकीची मागणी करूनही दुकानदार शांत राहिली. आता या दुकानदाराची सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
केआरएफओ न्यूज वेबसाइटनुसार, जाडा मॅकक्रे एक सिंगल मदर आहे आणि ती जाडा वॉल्टची मालकीन आहे. हे एक ऑनलाइन शॉप आहे जे शर्ट, हूडीज, कार्ड आणि मास्क विकतं. जाडा तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली जेव्हा तिच्या एका ग्राहकाने त्यांच्या दोघांचा एक मेल ट्विटरवर शेअऱ केला. (हे पण बघा : आरारारारा खतरनाक! चार महिलांचा हॉटेल कर्मचाऱ्यावर हल्ला, चौघींकडूनही दणादण बुक्क्यांचा मार!)
somebody come look at this pic.twitter.com/EK5u7buofu
— philip lewis (@Phil_Lewis_) March 10, 2021
'१२ म्हणजेच एक डझन होतात'
ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या ईमेलमधील बातचीतीनुसार अज्ञात ग्राहकाने लिहिले की, 'हॅलो, मी एक डझन मास्कची ऑर्डर दिली होती. पण तुम्ही मला केवळ १२ मास्क पाठवले आहेत. मला सर्व मास्कची गरज आहे. मला सर्व मास्कचे पैसे परत हवे आहेत. मी आता तुमच्या बिझनेसचं समर्थन कधीच करणार नाही. मी कृष्णवर्णीयांच्या बिझनेसला समर्थन देण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही लोक लोकांना लुटता'.
यानंतर जाडाने फारच प्रेमाने उत्तर दिलं आणि ग्राहकाला सांगितलं की, एक डझनचा अर्थ १२ मास्कच होतात. त्यामुळे जेवढे मास्क पाठवले ते बरोबर आहेत. त्यामुळे मी तुम्हाला पैसे परत देऊ शकत नाही. यानंतरही आपल्या ग्राहकाला निराशा केल्याबद्दल जाडाने माफी मागितली. आणि ५ डॉलर डिस्काउंटचं कूपन दिलं. याच्या उत्तरात ग्राहकाने कूपन घेण्यास मनाई केली आणि म्हणाला की, त्याला २० मास्कची गरज होती. त्याने १२ बाबत कधी ऐकलं नव्हतं.