समुद्राच्या मध्यभागी व्हेलसोबत खेळत होती एक व्यक्ती; पाहा व्हायरल व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 01:50 PM2019-11-09T13:50:08+5:302019-11-09T13:50:27+5:30

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समुद्राच्या मधोमध एक बोट असून त्या बोटीतील व्यक्ती समुद्रातील महाकाय व्हेल माशासोबत खेळताना दिसत आहे.

Arctic pole man plays fetch with beluga whale viral video | समुद्राच्या मध्यभागी व्हेलसोबत खेळत होती एक व्यक्ती; पाहा व्हायरल व्हिडीओ 

समुद्राच्या मध्यभागी व्हेलसोबत खेळत होती एक व्यक्ती; पाहा व्हायरल व्हिडीओ 

googlenewsNext

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये समुद्राच्या मधोमध एक बोट असून त्या बोटीतील व्यक्ती समुद्रातील महाकाय व्हेल माशासोबत खेळताना दिसत आहे. ती व्यक्ती व्हेल माशासोबत 'फेच द बॉल' हा गेम खेळताना दिसत आहे. 

समुद्राच्या मध्यभागी एका बोटीमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या हातात एक बॉल आहे. व्हेल मासा बॉल घेऊन पुन्हा माणसाकडे आणून देतो. मेट्रो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ आर्कटिक पोलवर रेकॉर्ड करण्यात आला आहे. 

न्यूझिलंड हेराल्डच्या रिपोर्टनुसार, या व्हिडीओमध्ये साउथ आफ्रिकेतील जेमिनी क्राफ्ट बोटीवरील क्रू मेंबर्सनी रेकॉर्ड केला आहे. 

पाहा व्हिडीओ : 

व्हिडीओची सुरुवात बेलुगा व्हेल बोटीवर असणाऱ्या एका व्यक्तीला बॉल आणून देतो. व्हेलकडून बॉल घेऊन ती व्यक्ती पुन्हा बॉल पाण्यात टाकतो आणि बेलुचा व्हेल पुन्हा बॉलचा पाठलाग करते आणि व्यक्तीकडे नेऊन देते. 

व्हायरल होणारा हा व्हिडीओ 7 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला असून त्याचे आतापर्यंत 4.4 मिलियन व्ह्यूज आहेत. तसेच 9 हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि 2 हजारांपेक्षा जास्त रि-ट्विट्स आहेत. 

व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एका यूजरने कमेंट दिली आहे की, 'फारच सुंदर, हा व्हिडीओ मी दिवसभर पाहू शकतो.' तसेच इतर यूजर्सनी लिहिलं आहे की, 'माझं आयुष्य मी पाहिलेला आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडीओ आहे हा.' 

नॅशनल जियोग्राफिकने दिलेल्या वृत्तानुसार, बेलुगा व्हेल एक सोशल अ‍ॅनिमल आहे. संवाद साधण्यासाठी हे शीटी देखील वाजवता.'

Web Title: Arctic pole man plays fetch with beluga whale viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.